Friday, March 29, 2024

जेव्हा माधुरी दीक्षितसाठी संजय दत्तने केलं आजारी पत्नीकडे दुर्लक्ष, काही दिवसातच झालं निधन

संजय दत्त (Sanjay Dutt) केवळ त्याच्या उत्कृष्ट अभिनयासाठीच नाही, तर त्याच्या वैयक्तिक आयुष्यासाठीही ओळखला जातो. संजय दत्तचे पहिले लग्न ऋचा शर्मासोबत (Richa Sharma) झाले होते. आज आम्‍ही तुम्‍हाला संजय दत्त आणि त्‍याची पत्‍नी रिचाच्‍या आयुष्‍याशी संबंधित एक किस्‍सा सांगणार आहोत, जो एकेकाळी खूप चर्चेत आला होता.

खरं तर, संजय दत्तची पत्नी ऋचा हिला एक गंभीर आजार होता, ज्यासाठी त्या उपचारासाठी अमेरिकेत होत्या. त्यावेळी, संजय दत्त बॉलिवूडमध्ये एकापाठोपाठ एक अनेक हिट चित्रपट देत होता. दरम्यान, संजय दत्तचे त्याच्या काळातील प्रसिद्ध अभिनेत्री माधुरी दीक्षितसोबत (Madhuri Dixit) अफेअर असल्याच्या बातम्या येत होत्या. (sanjay dutt ignored his wife richa sharma for madhuri dixit know what happened next)

संजय दत्तची आजारी पत्नी ऋचा हिला जेव्हा हे कळाले, तेव्हा ती आपले उपचार मध्येच सोडून अमेरिकेतून भारतात आल्याचे सांगितले जाते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ऋचाला संजय दत्तची दिलफेेक आशिकची इमेज देखील माहीत होती.

याच कारणामुळे जेव्हा तिला माधुरी दीक्षितसोबतच्या अफेअरची माहिती मिळाली, तेव्हा ती थेट भारतात आली. मात्र, इथे आल्यानंतरही ऋचाच्या अडचणी कमी झाल्या नाहीत. संजय दत्त आजारी पत्नीला घेण्यासाठी विमानतळावरही गेला नसल्याचे सांगण्यात येते.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, संजय दत्तच्या या वागण्यामुळे ऋचा आणि संजयच्या नात्यात दुरावा निर्माण झाला होता. त्याचवेळी मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणात संजय दत्तचे नाव आल्यानंतर, माधुरी दीक्षितनेही त्याच्यापासून अंतर राखले. दरम्यान ऋचाचा कर्करोगाने मृत्यू झाला आणि संजय आणि तिची मुलगी त्रिशालाचे (Trishala Dutt) संगोपन आजी-आजोबांनी केले. त्रिशाला अजूनही अमेरिकेत राहते.

हेही वाचा

हे देखील वाचा