Saturday, June 29, 2024

१४ जूनला ‘अल्याड पल्याड’ चा थरार; जाणून घ्या सविस्तर माहिती

आपण जो विचार करतो त्यापलीकडे जाऊन आपल्या आजुबाजूला अनेक घटना घडत असतात. भीतीदायक वाटणाऱ्या घटनांमागचं नेमकं रहस्य काय असणार? याची उकल करताना थरार, उत्कंठा, शोध या सगळ्या नजरबंदीच्या खेळातून अनुत्तरित प्रश्नांचा शोध घेणारा एस.एम.पी प्रोडक्शन् अंतर्गत ‘अल्याड पल्याड’ हा थरारपट १४ जूनला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाची निर्मिती शैलेश जैन आणि महेश निंबाळकर यांनी केली असून दिग्दर्शन प्रीतम एस के पाटील यांचे आहे. मकरंद देशपांडे, गौरव मोरे, संदीप पाठक, सक्षम कुलकर्णी, सुरेश विश्वकर्मा, चिन्मय उदगीरकर, भाग्यम जैन, अनुष्का पिंपुटकर आदि कलाकारांच्या भूमिका ‘अल्याड पल्याड’ चित्रपटात आहेत.

रहस्यमय गोष्टींचे सुप्त आकर्षण प्रत्येकाला असतेच. पोस्टरपासूनच उत्सुकता निर्माण करणाऱ्या ‘अल्याड पल्याड’ या मराठी चित्रपटाचा ट्रेलर लाँच सोहळा नुकताच संपन्न झाला. प्रदर्शित झालेल्या या ट्रेलर मधून जबरदस्त झलक दिसून येत आहे. अल्पावधीतच हा ट्रेलर ट्रेंडिंगला आला आहे.  दुर्गम भागातल्या एका गावाची, तिथल्या माणसांची रहस्यमय कथा असलेला ‘अल्याड पल्याड’ हा थरारपट आहे. एका रहस्याची उकल करताना त्यांच्या भोवती वेगवेगळ्या धक्कादायक घटनांची मालिका सुरु होते.  सरतेशेवटी एकदम ध्यानीमनी नसलेली गोष्ट समोर येते. या घटनेची  उकल कशी होते ? सत्य काय आहे? उत्कंठा, शोध, यातून कोणतं ‘रहस्य’ उलगडणार? हे ‘अल्याड पल्याड’ या चित्रपटातून प्रेक्षकांसमोर येणार आहे.

या चित्रपटाच्या निमित्ताने एक वेगळा प्रयत्न आम्ही केला असून हे ‘रहस्य’ प्रेक्षकांना जाणून घ्यायला नक्की आवडेल असा विश्वास दिग्दर्शक प्रीतम एस के पाटील यांनी यावेळी व्यक्त  केला.

‘अल्याड पल्याड’ चित्रपटाचे छायांकन योगेश कोळी यांचे तर संकलन सौमित्र धरसुलकर यांचे आहे. कलादिग्दर्शन योगेश इंगळे यांचे आहे. कथा प्रीतम एस के पाटील यांची असून पटकथा संवाद संजय नवगिरे यांचे आहेत. वेशभूषा अपेक्षा गांधी तर ध्वनी स्वरूप जोशी  यांचे आहे. कार्यकारी निर्माते संतोष खरात आहेत.लाईन प्रोड्यूसर दिपक कुदळे पाटील आहेत. रंगभूषा अभिषेक पवार यांची आहे. पार्श्वसंगीत अभिनय जगताप यांचे आहे. प्रोडक्शन मॅनेजरची  जबाबदारी  स्वानंद देव व विष्णू  घोरपडे यांनी सांभाळली आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

रेड्याने जुळवली लग्नगाठ ‘गाभ’ चित्रपटातून नवी जोडी रुपेरी पडद्यावर
सहा भाषांमध्ये ऐकायला मिळणार श्रेया घोषालचा आवाज, ‘द कपल साँग’ या दिवशी रिलीज होणार

हे देखील वाचा