नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘फँड्री’ चित्रपटातील ‘शालू’ म्हणजेच राजेश्वरी खरात आजकाल खूपच लाईमलाईटमध्ये राहते. ‘फँड्री’मध्ये जब्या आणि शालूची प्रेमकथा खूपच गाजली. विशेष म्हणजे, चित्रपटात खूप डायलॉग न बोलता, राजेश्वरीने केवळ आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना वेड लावले. यामुळे तिच्या खऱ्या नावापेक्षा चित्रपटातील नावाने तिला अधिक ओळखले जाते.
‘फँड्री’ चित्रपटातील साधी-भोळी शालू आता खूपच बोल्ड झाली आहे. चित्रपट आल्यानंतर ती इतकी प्रसिद्ध नव्हती, जितकी आजकाल ती तिच्या सोशल मीडिया पोस्ट्समुळे प्रसिद्ध होत आहे. सतत वेगवेगळ्या लूकमध्ये फोटो आणि व्हिडिओ शेअर करत, ती माध्यमांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेते. शालूच्या फोटोवर लाईक्स आणि कमेंट्स करत चाहतेही तिच्या कौतुकाचे पूल बांधतात.
अलीकडेच गुढीपाडव्याच्या निमित्ताने शालूचा पारंपारिक अंदाज पाहायला मिळाला. निळ्या रंगाची नऊवारी साडी नेसून तिने चाहत्यांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या. तिचा हा पारंपारिक लूक चाहत्यांना खूप आवडल्याचे दिसून आले. या फोटोंवर लाईक्स अन् कमेंट्सचा अक्षरशः पाऊस पडला.
इतकेच नव्हे, तर १४ एप्रिल रोजी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्तही तिने काही फोटो पोस्ट केले. यात फोटोमध्ये ती आंबेडकरांच्या प्रतिमेसमोर उभी राहून त्यांना अभिवादन करताना दिसली. नेहमीप्रमाणेच या फोटोलाही खूप प्रेम मिळाले.
तिने बुधवारी (२१ एप्रिल) श्रीराम नवमीनिमित्तही आपला साडीतील फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोवरही चाहते कमेंट करण्यास चुकले नाहीत.
राजेश्वरीचा जन्म ८ एप्रिल, १९९८ रोजी पुण्यात झाला होता. कुटुंबात ती तिच्या पालकांसोबत राहते. तिचे वडील एका बँकेत काम करतात. तसेच तिने पुण्याच्या जोग एज्युकेशन ट्रस्टमधून शालेय शिक्षण घेतले. बारावी पूर्ण झाल्यानंतर तिने सिंहगड कॉलेज, पुणे येथून बी. कॉम मध्ये पदवी मिळवली.
राजेश्वरीने ‘फँड्री’ चित्रपटाव्यतिरिक्त सन २०१७ साली ‘आयटमगिरी’ या चित्रपटात काम केले आहे. मात्र, या चित्रपटाला फँड्रीसारखे यश मिळाले नाही.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-समंथा अक्किनेनीने शेअर केला बोल्ड लूक; पाहा हिरव्या- सोनेरी गाऊनमधील ग्लॅमरस अभिनेत्रीची हॉटनेस
-सलमान-अक्षयबरोबर काम केलेल्या अभिनेत्रीचे बिकीनवरील फोटो-व्हिडीओ व्हायरल, तुम्हीही टाका एक नजर