Thursday, September 24, 2026
Home साऊथ सिनेमा समंथा अक्किनेनीने शेअर केला बोल्ड लूक; पाहा हिरव्या- सोनेरी गाऊनमधील ग्लॅमरस अभिनेत्रीची हॉटनेस

समंथा अक्किनेनीने शेअर केला बोल्ड लूक; पाहा हिरव्या- सोनेरी गाऊनमधील ग्लॅमरस अभिनेत्रीची हॉटनेस

दक्षिण भारतीय सिनेमात अशा बर्‍याच अभिनेत्री आहेत, ज्यांनी अभिनयासोबतच आपल्या लूकमुळेही सर्वांना वेड लावले आहे. यापैकी एक म्हणजे अभिनेत्री समंथा अक्किनेनी होय. समंथाचे चाहते तिच्या अदांवर फिदा आहेत. अशातच आता या अभिनेत्रीने तिचे नवीन फोटो शेअर करुन पुन्हा चाहत्यांचे लक्ष वेधले आहे.

अलीकडेच समंथाने स्वत: चे काही अतिशय ग्लॅमरस फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट केले आहेत. फोटो पाहून चाहत्यांच्या काळजाचा ठोका चुकला आहे, असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. यामध्ये समंथाने हिरव्या रंगाचा सोनेरी गाऊन परिधान केला आहे, ज्यात ती खूपच हॉट दिसत आहे.

दोन दिवसांपूर्वीही तिने याच ड्रेसमध्ये एक फोटो शेअर केला होता. नेहमीप्रमाणेच चाहत्यांनी या फोटोलाही खूप प्रेम दिले आहे. चाहते यावर कमेंट करून आपले प्रेम व्यक्त करत आहेत. चाहत्यांच्या पसंतीमुळे फोटो बघता बघताच व्हायरल झाला.

समंथा अक्किनेनी ही दक्षिण सिनेमातील स्टायलिश आणि ग्लॅमरस अभिनेत्रींपैकी एक आहे. ती सतत इंस्टाग्रामवर तिचे जबरदस्त फोटो पोस्ट करत असते. काही दिवसांपूर्वीच समंथाने एरियल योग करतानाचा एक फोटो शेअर केला होता. हा फोटो पाहून अभिनेत्रीची तंदुरुस्ती लक्षात येत आहे.

समंथाच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर अभिनेत्री लवकरच ‘द फॅमिली मॅन- २’ मध्ये दिसणार आहे. ही सीरिज मनोज बाजपेयीचे डिजिटल पदार्पण आहे. यासह, समंथा ‘काठू वाकुला रेंडू कढल’ या चित्रपटात दिसणार आहेत. तिच्या व्यतिरिक्त विजय सेतूपती आणि नयनतारा हे कलाकारही या चित्रपटात मुख्य भूमिकेत असतील.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-व्हिडिओ: आदित्य नारायणसोबत ठुमके लावणे नेहा कक्करला पडले महागात, डान्स करताना घसरला पाय अन् पडली धपकन!

-‘मुलींना खूप गरम होते कारण त्या खूप हॉट असतात’, पाहा नक्की काय केलाय ‘या’ अभिनेत्रीने असा दावा

-मातीशी नाळ जोडलेला अभिनेता पंकज त्रिपाठीने सर्वांसमोर केला बिहारचा ‘लौंडा’ डान्स, ‘द कपिल शर्मा शो’मधील व्हिडिओ व्हायरल

हे देखील वाचा