अभिनेत्री अंबर हर्ड (Amber Heard) तिचा पूर्व पती आणि हॉलिवूड सुपरस्टार जॉनी डेप (Johnny Depp) विरुद्ध मानहानीचा खटला हरल्यानंतर, तिच्या आर्थिक परिस्थितीबद्दल सतत चर्चेत असते. खटला हरल्यानंतर अंबरच्या वकिलाने युक्तिवाद केला की, अंबर नुकसान भरपाई करण्यास सक्षम नाही. दरम्यान अलीकडेच अंबर एका खासगी जेटमध्ये दिसली, त्यानंतर लोकांनी तिच्यावर प्रश्नांचा वर्षाव केला. खासगी जेटमध्ये प्रवास करण्यासाठी पैसे आहेत, पण नुकसान भरपाईसाठी नाही का? असा सवाल लोकांनी केला. यानंतर अंबर पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. अलीकडेच ती एका डिस्काउंट स्टोअरमधून खरेदी करताना दिसली, ज्यामुळे ती पुन्हा मीडियाच्या चर्चेत आली आहे.
बहिणीसोबत शॉपिंग करताना अभिनेत्री
प्रायव्हेट जेटमध्ये प्रवास करताना दिसल्यानंतर, अंबर अशी बजेट शॉपिंग करताना दिसली आहे. ती न्यूयॉर्कमधील डिस्काउंट डिपार्टमेंटल स्टोअरमध्ये खरेदी करताना दिसली, जिथे कपडे सामान्य किमतीत मिळतात. खरेदीवेळी अंबरची बहीण व्हिटनी हर्डही तिच्यासोबत होती. खरं तर, व्हिटनीने खटल्यादरम्यान अंबरची साक्ष दिली आणि बहिणीच्या विरोधात निकाल आल्यानंतर समर्थनही केले. (amber heard shopping at a discount store)
केस हरल्यानंतर, अलीकडेच अभिनेत्रीच्या वकिलाने दावा केला होता की अंबर तिच्या पूर्व पती जॉनी डेपला १० मिलियन डॉलर देऊ शकत नाही. मात्र वॉशिंग्टन डीसी विमानतळावर एका खासगी विमानातून बाहेर पडताना आणि लक्झरी एसयूव्हीमध्ये चढल्यावर अंबर हर्डला पॅपराझींनी क्लिक केले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अंबरसोबत इतर चार लोकही उपस्थित होते. मिळालेल्या माहितीनुसार, अभिनेत्री तिच्या कामाच्या मीटिंगसाठी न्यूयॉर्क शहरात होती. जॉनी डेप विरुद्ध मानहानीच्या खटल्यातील निकालानंतर अंबरची ही पहिलीच सार्वजनिक उपस्थिती होती. प्रायव्हेट जेटमध्ये दिसल्यानंतर लोक त्याच्या आर्थिक स्थितीबद्दल प्रश्न विचारू लागले.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा