Justin Bieber Health Update: पत्नीने जस्टिन बीबरच्या आरोग्याबद्दल दिली महत्वाची माहिती

प्रसिद्ध पॉप गायक जस्टिन बीबरच्या (Justin Bieber) चेहऱ्याला अर्धांगवायू झाल्याची माहिती दिली होती. या बातमीने त्याच्या जगभरातील चाहत्यांना मोठा धक्का बसला होता आणि लोक त्याच्या लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करू लागले होते. प्रत्येकालाच त्याच्या तब्बेतीची काळजी लागली होती. मात्र आता जस्टिनची पत्नी हेली बीबरने गायकाला हेल्थ अपडेट दिले आहे. हेली बीबरच्या मते, जस्टिन आधीच ठीक आहे आणि बरा होत आहे. हेलीने दिलेल्या बातमीने जस्टिनच्या चाहत्यांची चिंता मिटली आहे.

जस्टिन बीबर हा जगप्रसिद्ध पॉप गायक म्हणून प्रसिद्ध आहे. त्याच्या गाण्यांचे आवाजाचे जगभरात असंख्य चाहते आहेत. काही दिवसांपूर्वी जस्टिन बीबरने त्याच्या इंस्टाग्रामवर सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला होता, ज्यामध्ये त्याने तो रामसे हंट सिंड्रोम नावाच्या आजाराने ग्रस्त आहे. त्यामुळे त्यांचा चेहऱ्याला अर्धांगवायू झाल्याचे सांगितले होतो. ‘मला हा आजार एका विषाणूमुळे झाला आहे, ज्याने माझ्या कामावर आणि चेहऱ्याच्या मज्जातंतूंवर हल्ला केला आहे. यामुळे माझ्या चेहऱ्याच्या एका बाजूला अर्धांगवायू झाला आहे. मी डोळे मिचकावू शकत नाही, तुम्ही हे पाहू शकता. मला या बाजूने हसूही येत नाही आणि माझे नाकही या बाजूने हलू शकत नाही, असे या व्हिडिओमध्ये त्याने सांगितले होते. या बातमीने त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला होता.

आता त्याच्या पत्नीने जस्टिनच्या प्रकृतीबद्दल मोठा खुलासा केला आहे. एका मुलाखतीत बोलताना हेली बीबरने ‘तो दररोज चांगली कामगिरी करत आहे. त्याला खूप छान वाटतंय. साहजिकच जे घडले ते खूप भीतीदायक होते आणि खूप अचानक होते, पण आता तो बरा होत आहे. सर्वांनी शुभेच्छा, सल्ला दिला. त्याबद्दल आभारी आहे. हे प्रेम पाहणे खूप सुंदर होते.’ अशा शब्दात चाहत्यांचेही आभार मानले आहेत.