Friday, June 13, 2025
Home कॅलेंडर अभिनेत्री अमिषा सोबत विमानात घडली अशी घटना की तिच्या डोळ्यात आले अश्रू…

अभिनेत्री अमिषा सोबत विमानात घडली अशी घटना की तिच्या डोळ्यात आले अश्रू…

बॉलिवूड स्टार्स हे नेहमीच चित्रीकरणासाठी विमानाने परदेशात जात असतात. तिथे या स्टार्सना चाहत्यांचं प्रेम अनुभवायला मिळतं. बऱ्याचदा विमानात देखील चाहते या स्टार्सना ओळखतात आणि त्यांचे ऑटोग्राफ्स घेतात. अशीच एक घटना काही दिवसांपूर्वी बॉलिवूड अभिनेत्री अमिषा पटेल हिच्यासोबत घडली. अमिषा ही विमानप्रवास करत असताना तिच्या चाहत्यांनी तिला एक स्पेशल सरप्राईज दिलं जे पाहून अमिषा त्या विमानात भावुक झाली. नेमकं असं काय झालं होतं त्या विमानात आणि कुणी केलं अमिषाला सरप्राईज चला पाहुयात.

अभिनेत्री अमिषा पटेलचं नाव जरी ऐकलं तरी आपल्या ओठांवर लगेच कहो ना प्यार है हे नाव येतं. मग विचार करा त्या विमानात अमिषा पटेल तिच्या चाहत्यांना चक्क दिसली तर त्यांची अवस्था काय झाली असेल? त्या चाहत्यांनी अमिषा पटेलसाठी कहो ना प्यार है या गाण्यावर स्पेशल डान्स सादर केला. चाहत्यांचं मिळालेलं इतकं प्रेम पाहून अमिषा देखील काही काळासाठी भावुक झाली आणि मग त्या चाहत्यांसोबत डान्स करू लागली. आपल्याला प्रश्न पडला असेल की हे चाहते होते तरी कोण? तर हे चाहते दुसरे तिसरे कुणी नसून अमिषा ज्या इंडिगो एअरलाईन्सच्या फ्लाईटमधून प्रवास करत होती त्या फ्लाईटवरील कर्मचारी होते. या कर्मचाऱ्यांनी अमिषाला पाहून तिच्या समोर या गाण्यावर थिरकायलाच सुरुवात केली आणि मग अमिषानेदेखील काही भावुक क्षण सोडले तर त्या कर्मचाऱ्यांसोबत खूप मजा केली. या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ आता खूप व्हायरल झाला आहे.

अमिषा पटेल हिने हृतिक रोशन सोबतच कहो ना प्यार है या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. यानंतर अमिषाने सनी देओल बरोबर गदर या सिनेमा केला. आणि खऱ्या अर्थाने अमिषा पटेलला प्रसिद्धी मिळाली. यानंतर अमिषाचा २००२ मध्ये आलेला आप मुझे अच्छे लगने लगे या चित्रपटानेही बॉक्स ऑफिसवर तुफान गल्ला कमावला.

सुरुवातीचा काही काळ बॉलिवूड गाजवल्यानंतर अमिषा हळू हळू बॉलीवूडमधून दिसेनाशी होत गेली. २०१८ मध्ये तिचा सनी देओल, प्रीती झिंटा यांच्यासोबत भैय्याजी सुपरहिट नावाचा चित्रपट आला होता. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर साफ आपटला.

सध्या अमिषा ही सोशल मीडियावर जास्त ऍक्टिव्ह असते. इन्स्टाग्रामवर तर अमिषाचे ३ मिलियनपेक्षाही जास्त फॉलोअर्स आहेत. तिच्या या चाहत्यांसाठी ती तिचे हॉट आणि बोल्ड फोटोज अपलोड करत असते तसंच काही आरोग्यविषयक टिप्स सुद्धा देत असते.

हे देखील वाचा