Saturday, April 19, 2025
Home कॅलेंडर विमान कर्मचाऱ्यांच्या डान्समुळे अमिषा झाली भावुक, २० वर्षपूर्वीच्या आठवणी झाल्या ताज्या

विमान कर्मचाऱ्यांच्या डान्समुळे अमिषा झाली भावुक, २० वर्षपूर्वीच्या आठवणी झाल्या ताज्या

बॉलिवूडमध्ये कोणाचे नशीब कसे चमकेल आणि ही यशाची चमक कधी कशी कमी होईल काही सांगता येत नाही. असेच काहीसे नशीब आहे अमिषा पटेलचे. अमिषा तिच्या पहिल्याच ‘कहो ना प्यार हैं’ चित्रपटाने रातोरात स्टार झाली. तिच्याकडे सुपरस्टार म्हणूनच पाहिले जावू लागले. ‘कहो ना प्यार हैं’ नंतर अमिषा ‘गदर’ या सिनेमात दिसली. या चित्रपटातील अमिषाच्या अभिनयाला प्रेक्षक आणि समीक्षक दोघांकडूनही वाहवा मिळाली. या सिनेमासाठी अमिषाला अनेक पुरस्कार सोहळ्यांमध्ये नामांकन देखील मिळाले.

अमिषाने अनेक हिट सिनेमे बॉलिवूडला दिले, मात्र तिला ते विशिष्ट स्टारडम मिळवता आले नाही.
अमिषा मागील काही वर्षांपासून मोठ्या पडद्यापासून गायबच आहे. तरी अमिषा बऱ्याचदा चर्चांमध्ये येते. याचे कारण अमिषा सोशल मीडियावर मोठ्या स्वरूपात सक्रिय आहे. अनेक फोटो, व्हिडिओ ती तिच्या अकाऊंटवरून शेयर करत असते. आता अमिषा बातम्यांमध्ये येण्याचे कारण म्हणजे, आमिषांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूप वायरल होताना दिसत आहे.

या व्हिडिओत एका विमान कंपनीचे कर्मचारी अमिषा समोर तिच्या ‘कहो ना प्यार है’ गाण्यावर नाचताना दिसत आहे. त्यांना बघून अमिषाच्या डोळ्यात पाणी आले आहे. अमिषा देखील त्याच्यासोबत नाचताना दिसत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आमिषाने सर्व नियमांचे पालन करत मास्क, ग्लोव्हस घातले आहेत.

चित्रपटांपासून अमिषा आता दूर असली तरी तिच्या फॅन्समध्ये कोणतीच कमतरता झाली नाहीये. अमिषाच्या सर्व पोस्टला तिच्या फॅन्स कडून भरभरून दाद मिळत असते. ह्या व्हिडिओला देखील मोठ्या प्रमाणावर लाईक्स आणि कमेंट्स येत आहेत.

आमिषाने चित्रपटांसाठी बोल्ड भूमिका देखील केल्या मात्र तिला यश मिळाले नाही. अमिषा शेवटची ‘भैयाजी सुपरस्टार’ सिनेमात दिसली होती. त्यानंतर ती छोट्या पडद्यावरील विवादित कार्यक्रम बिग बॉसच्या घरच्या मालकिणीच्या रूपातही दिसली, पण या कार्यक्रमातून ती मधेच दिसेनाशी झाली. अजूनतरी आमिषाने तिच्या कोणत्याच चित्रपट अथवा इतर गोष्टींबद्दल माहिती दिली नाहीये.

 

हे देखील वाचा