Sunday, February 23, 2025
Home बॉलीवूड Viral Video: अभिनेत्री अमिषा पटेलच्या बोल्डनेसचा कहर, व्हायरल व्हिडिओने केले नेटकऱ्यांना घायाळ

Viral Video: अभिनेत्री अमिषा पटेलच्या बोल्डनेसचा कहर, व्हायरल व्हिडिओने केले नेटकऱ्यांना घायाळ

हिंदी सिने जगतात अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्या सध्या सिने जगतात फारशा दिसत नसल्या तरी सोशल मीडियावर मात्र नेहमीच सक्रिय असतात. यांपैकीच एक अभिनेत्री म्हणजेच अमिषा पटेल (Ameesha Patel). आपल्या सहजसुंदर अभिनयाने आणि घायाळ करणाऱ्या सौंदर्याने ९० च्या दशकात अमिषा पटेलने सर्वांनाच वेड लावले होते. तिच्या त्या काळच्या गाजलेल्या चित्रपटांची  आजही जोरदार चर्चा होताना दिसत असते. सध्या सिने जगतात  दिसत नसली तरी अमिषा सोशल मीडियावरही नेहमीच सक्रिय असते. सध्या अमिषाच्या एका व्हिडिओने सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घातला आहे ज्यामधील तिच्या बोल्ड अदांवर नेटकरी चांगलेच मोहित झाले आहेत. 

‘कहो ना प्यार है’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री अमिषा पटेलने आपल्या पहिल्याच चित्रपटाने लोकांना वेड लावले होते. तिने’गदर’, ‘हमको तुमसे प्यार है’, ‘वादा’ यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. अमिषा काही काळापासून फिल्मी दुनियेपासून दूर असली तरी तिच्या ग्लॅमरस स्टाइलमुळे सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. ती नेहमीच तिचे हॉट फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. अलीकडेच, अमिषा पटेलने पुन्हा एकदा तिच्या बोल्ड लूकने इंटरनेटवर खळबळ उडवून दिली आहे.

https://www.instagram.com/tv/CfGbFwKoW0x/?utm_source=ig_web_copy_link

अलीकडेच अमिषा पटेलने तिच्या इंस्टाग्राम हँडलवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ती साइड पोज देऊन लोकांना वेड लावत आहे. व्हिडिओमध्ये अमिषाने हॉल्टर नेक ब्रा घालताना दिसत आहे. तिने तिच्या नावाचा हार आणि निराळ्या हेअरस्टाईलने तिचा लूक पूर्ण केला. व्हिडिओ शेअर करताना अमिषाने कॅप्शनमध्ये  “उन्हाळ्याची वेळ, पोहण्याची वेळ” असा कॅप्शन दिला आहे.  अमीषाच्या या स्विम लूकने तिच्या 4.3 दशलक्ष फॉलोअर्सला वेड लावले ​​आहे. त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे. अमिषाच्या या लूकने आघाडीच्या अभिनेत्रींना टक्कर दिली आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हे देखील वाचा