Sunday, May 19, 2024

HIT Movie Trailer : राजकुमार रावच्या आगामी ‘हिट’ चित्रपटाचा अंगावर काटा आणणारा धमाकेदार ट्रेलर आला समोर

बॉलिवूड अभिनेता राजकुमार रावने (Rajkumar Rao) त्याच्या दमदार अभिनयाने अल्पावधीतच सिने जगतात प्रचंड लोकप्रियता मिळवली आहे. अनेक आव्हानात्मक भूमिका साकारून राजकुमारने त्याच्या अभिनयाची चुणूक दाखवून दिली आहे. त्यामुळेच त्याच्या प्रत्येक चित्रपटाची प्रेक्षकांना जोरदार उत्सुकता लागलेली असते. आपल्या दमदार अभिनयासाठी ओळखला जाणारा राजकुमार राव लवकरच त्याच्या क्राइम थ्रिलर चित्रपट ‘हिट द फर्स्ट केस’मध्ये दिसणार आहे. चित्रपटाच्या दमदार टीझरनंतर आता चित्रपटाच्या निर्मात्यांनी त्याचा ट्रेलर रिलीज केला आहे. जो सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. 

राजकुमार रावच्या आगामी चित्रपटात अभिनेता राजकुमार रावसोबत अभिनेत्री सान्या मल्होत्राही दिसणार आहे. या चित्रपटाचा टीझर रिलीज झाल्यापासून प्रेक्षक या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत होते. अशा परिस्थितीत प्रेक्षकांची ही उत्सुकता कमी करत निर्मात्यांनी आता त्याचा ट्रेलर लाँच केला आहे. चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये राजकुमार राव एका पोलिसाच्या भूमिकेत दिसत आहे. यासोबतच तो एका बेपत्ता व्यक्तीच्या प्रकरणाची चौकशी करतानाही दिसत आहे. चित्रपटात सान्या मल्होत्रा ​​त्याच्या मैत्रिणीच्या भूमिकेत दिसत आहे. याशिवाय सानू कुमार, रोहन सिंग असे नवे कलाकारही यात दिसत आहेत.

राजकुमार रावचा हा चित्रपट तेलगू चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे. चित्रपटात राजकुमार राव एका पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारत आहे जो त्याच्या भूतकाळातील आठवणीमुळे मानसिक आजाराने त्रस्त आहे. त्याचवेळी अभिनेत्री सान्या मल्होत्रा ​​त्याच्या मैत्रिणीची भूमिका साकारत आहे. या चित्रपटात राजकुमार एका बेपत्ता मुलीचे  प्रकरण सोडवताना दिसत आहे. दरम्यान, राजकुमार रावची मैत्रीण अचानक गायब होते. चित्रपटाचा ट्रेलर पाहता चित्रपट सस्पेन्स आणि थ्रिलने भरलेला आहे असे म्हणता येईल.

दरम्यान ‘हिट’ या चित्रपटाचा हिंदी रिमेक डॉ. शैलेश कोलानु यांनी दिग्दर्शित केला आहे, ज्यांनी तेलुगू चित्रपटाचेही दिग्दर्शन केले होते. राजकुमार राव आणि सान्या मल्होत्रा ​​यांच्याशिवाय या चित्रपटात दलीप ताहिल, मिलिंद गुणाजी, शिल्पा शुक्ला आणि संजय नार्वेकर यांच्या भूमिका आहेत. हा चित्रपट 15 जुलै रोजी थिएटरमध्ये रिलीज होणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हे देखील वाचा