आपल्या दमदार अभिनयाने आणि घायाळ करणाऱ्या सौंदर्याने सिनेसृष्टी गाजवणाऱ्या अभिनेत्रींमध्ये अमिषा पटेलचं (Ameesha Patel) नाव प्रामुख्याने घेतले जाते. अमिषा पटेलच्या अभिनयाची जोरदार चर्चा व्हायची. त्यामुळेच अमिषा पटेलला ९०च्या दशकातील प्रमुख अभिनेत्री समजले जायचे. मात्र हे वर्चस्व तिला फार काळ टिकवता आले नाही आणि कालांतराने ती सिनेसृष्टीपासून दूर गेली. मात्र आता पुन्हा एकदा अमिषा पटेलने आपल्या चित्रपटाच्या तयारीला सुरुवात केली आहे. यावेळी तिने अभिनेता ऋतिक रोशनबद्दल (Hrithik Roshan) एक मोठा खुलासा केला आहे, ज्याची सध्या सर्वत्र चर्चा पाहायला मिळत आहे.
‘कहो ना प्यार है’ चित्रपटातुन आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरवात करणारी अभिनेत्री अमिषा पटेल अल्पावधीतच सिनेसृष्टीत आघाडीची अभिनेत्री म्हणून लोकप्रिय ठरली होती. त्यानंतर आलेल्या ‘गदर’, ‘हमराज’ सारख्या चित्रपटांनी तिला प्रचंड लोकप्रियता मिळवुन दिली. ‘गदर’ चित्रपटातील तिच्या भूमिकेचं सर्वत्र कौतुक केलं गेलं. मात्र हा यशाचा आलेख तिला फार काळ उंचावता आला नाही. मात्र आता ती पुन्हा एकदा ‘गदर २ ‘चित्रपटाद्वारे दमदार पुनरागमण करणार आहे. अभिनेता सनी देओलसोबत ती या चित्रपटात झळकणार असून सध्या या चित्रपटातचे चित्रीकरण जोरात सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर अमिषा पटेलने आपल्या पहिल्या चित्रपटाविषयी धक्कादायक खुलासा केला आहे.
साल २०००मध्ये आलेल्या या चित्रपटाच्या शुटिंगवेळी मला सगळे खूप गर्विष्ठ समजत होते, असा खुलासा अमिषाने केला आहे. याबद्दल एका मुलाखतीत बोलताना अमिषाने सांगितले की, “त्यावेळी माझी एका श्रीमंत घरातील गर्विष्ठ आणि वाया गेलेली मुलगी अशीच प्रतिमा तयार झाली होती. कारण मी सेटवर कुणाशी जास्त बोलतही नव्हते आणि कुणाच्या इतर भानगडीतही पडत नव्हते. मला त्यावेळी पुस्तक वाचण्याचा छंद होता आणि मी त्यावेळी नेहमी पुस्तके वाचण्यात व्यस्त असायचे. एक पुस्तक मी अवघ्या तीन दिवसात वाचून पुर्ण करायचे. त्यामुळे मी इतर कोणाशी जास्त बोलत नसे. याच कारणामुळे लोक मला खूपच स्वार्थी समजायचे.” अमिषा खूपच घमंडी आहे, स्वतःला काय समजते काय माहित. श्रीमंत घरातील असल्याचा तिला खूप गर्व आहे, म्हणूनच पहिल्याच दिवशी शूटिंगसाठी मर्सिडीज घेऊन आली आणि अभिनेता ऋतिक मारुतीमध्ये आला. अशी तुलना त्यावेळी करण्यात आली होती, असाही खुलासा अमिषाने यावेळी केला. मात्र यावर आपली भूमिका मांडताना अमिषाने सांगितले की, “यामध्ये काहीच दिखावा नव्हता, मी याच वातावरणात वाढले, मोठी झाले कोणाविषयी वाइट बोलणे मला शिकवले नव्हते.”
दरम्यान, आता चाहत्यांना अमिषा पटेलच्या ‘गदर २’ चित्रपटाची जोरदार उत्सुकता लागली आहे.
हेही वाचा :
- जान्हवी कपूर दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत देखील घालणार धुमाकूळ, ज्युनिअर एनटीआरसोबत साऊथमध्ये करणार एंट्री
- करीना कपूरसोबतच्या वादावर अमिषा पटेलने तोडले मौन, २२ वर्षांनंतर अभिनेत्रीने सांगितले सत्य
- अनेक वर्षानंतर सुनील शेट्टी आणि संजय दत्तची जोडी पुन्हा एकदा झळकणार, आगामी चित्रपटात दिसणार एकत्र