हॉलिवूड मनोरंजन क्षेत्रामधून नुकतंच एक दु:खद बातमी समोर येत आहे. इंडस्ट्रीमधील प्रसद्ध अभिनेता आणि डान्सर स्टीफन बॉस त्याने (दि, 13 डिसेंबर) रोजी वयाच्या 40 व्या वायातच शेवटचा श्वास घेतला आहे. माहितीनुसार अभिनेत्याचे निधन आत्माहत्या केल्याने झाले असून त्याचा देह हॉटेलमध्ये सापडला. स्टीफन बॉस ‘द एलिन डी जॉनर्स’, आणि ‘सो यू थिंक यू कैन डांस’सारख्या कार्यक्रमांसाठी अभिनेता ओळखला जायचा. त्याशिवाय स्टीफनने आपल्या डान्सनेही चाहत्यांच्या मनात जागा निर्माण केली होती.
माध्यमातील वृत्तानुसार पोलिसांना स्टीफन बॉस (Stephen Boss) याचा देह लॉस एंजिलिसमधील एका हॉटेलच्या खोलीमध्ये मिळाला होता. तिथेच त्याची एलिसन हॉकर हिने सांगितले की, “बॉस त्याच्या कारशिवाय घरातून बाहेर पडला होता मात्र, ही गोष्ट हैराण करणारी होती कारण बॉस आपल्या गाडीशिवाय कधीच घराच्या बाहेर पडत नाही.” स्टीपनच्या अचानक निधनानंतर त्याचे कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे. त्यासोबतच कलाविश्वातही शोककळेचे वातावरण पसरले आहे. अभिनेत्याच्या निधनानंतर चाहतेही दु:खात आहेत.
माहितीनुसार असे म्हटले जात आहे की, स्टीफन बॉसने स्वत:ला गोळी मारुन आपले आयुष्य संपवून टाकले आहे. मात्र, त्याने आत्माहत्यासारखे एवढे मोठे पाऊल का उचलले याबद्दल अद्याप काही समोर आले नाही. स्टीफनच्या निधनानंतर त्याची पत्नी एलिना हॉकर (Allison Holker) हिने एका मुलाखतीमध्ये सांगितले की, “मला मानवर दगड ठेवून सांगायचे आहे की, माझा नवरा स्टीफन आम्हा सर्वांना सोडून गेला आहे. तो आपल्या कुटुंबाला, मित्रांना आणि समाजाला खूप महत्त्व देत होता. प्रेम त्याच्यासाठी सर्वस्व होतं. तो आमच्या कुटुंबाचा कणा होता. तो एक चांगला पती आणि वडील होता. तो त्यांच्या चाहत्यांसाठीही प्रेरणास्थान होता. त्याचा सकारात्मक दृष्टिकोन तुम्हाला नेहमीच जाणवेल.” याशिवाय एलिन म्हणाली, “या कठीण काळात आमच्या गोपनियतेची काळजी घ्या. विशेषतः माझी आणि माझ्या तीन मुलांची काळजी घ्या.”
स्टीफनच्या निधनानंतर बॉलिवूड मनोरंज क्षेत्रामध्ये शोककळेचे वातवरण पसरले आहे. त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला असून कलाविश्वातून एक चांगला अभिनेता हरवला आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा-
मोठ्या मनाचा विजय! अपंग चाहत्याला कुशीत उचलून अभिनेत्याने काढला फोटो, सोशल मीडियावर कौतुकाचाठ
जाळ अन् धूर संगटच! क्रिती सेननचा पांढऱ्या रंगाच्या ड्रेसमध्ये राडा