Thursday, June 13, 2024

मोठ्या मनाचा विजय! अपंग चाहत्याला कुशीत उचलून अभिनेत्याने काढला फोटो, सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव

साउथ सुपरस्टारर अभिनेता विजय याच्या दमदार अभिनयाचे चाहते साउथच नाही तर भरतभर पसरलेले आहेत. त्याने साउथ इंडस्ट्रीमध्ये वेगळेच स्थान निर्माण केले आहे. विजय अभिनयासोबतच राजकारणातही नशिब आजमावत आहे. अभिनेत्याने नुकतंच ‘विजय मक्कल इयक्कम’ च्या सदस्यांनाभेट दिली. 

लोकप्रिय अभिनेता विजय याने नुकतंच ‘विजय मक्कल इयक्कम’च्या ,सदस्यांसोबत चैनईमधील आपल्या पनैयुर कार्यालयमध्ये एका बैठकीमध्ये सहभागी झाला होता. तेव्हा विकासने या मुलाखतीसाठी अनेक अडचनी सांगितल्या होत्या की, अभिनेता आपल्या राजनैतिक करिअरसाठी कष्ट करत आहे. तेव्हा माध्यमातील वृत्तानुसार ही बैठक अभिनेत्याच्या फैन क्लब आणि कामकाजासाठी झाली होती. या बैठकमध्ये अभिनेत्याने फैन क्लबबद्दल सविस्तर बोलणी केली आहे. ही बैठक विजयचा आगामी येणारा पोंगल ‘वारिस’ प्रदर्शनापूर्वी झाली आहे. हा चित्रपट विजयच्या आयुष्यामधील एक महत्वाचा भाग बननार आहे कारण बॉक्स ऑफिसवर अजीतचा ‘थुनिवु’ चित्रपटही प्रदर्शित होणार आहे.

याचदरम्याणचा एक फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ज्यामध्ये विजयने त्याच्या अपंग चाहत्याला उचलून घेतले आहे. विजयाचा हा फोटो चात्याच्या पसंतीस उतरला आहे. या फोटोमध्ये विजय काळ्या रंगाच्या कपड्यामध्ये दिसून येत आहे आणि आपल्या अपंग चाहत्याला उचलून फोटो घेताना दिसून येत आहे.

विजय नोव्हेबरमध्ये नमक्कल आणि कांचीपुरम सारख्या जिल्ह्यांमध्ये आपल्या चाहत्यांना फैन क्लबद्वारे भेटला. त्याच्या राजकीय प्रवेशाच्या अफवांमागे अशा भेटींची मालिका आहे. दरम्यान, ‘वारिसू’ चित्रपट रिलीजसाठी तयारी करत आहे आणि ते पोस्ट-प्रॉडक्शन टप्प्यात आहे. “रंजीथम” आणि “थी थालपथी” या गाण्यांनी इंटरनेटवर तुफान लोकप्रियता मिळवणारा ‘वारिसु’ पुढील पोंगल बॉक्स ऑफिसवर चांगली ओपनिंग करेल असे दिसून येत आहे.

वामशी पैडिपल्ली यांनी दिग्दर्शित वारिसू चित्रपटामध्ये रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) मुख्य भूमिकेत दिसणार आहे. थमनच्या संगीतासह, या चित्रपटात सरथकुमार, प्रभू, शाम, प्रकाश राज (Prakash Raj) आणि आर. सरथकुमार हे कलाकरही मुख्य भूमिकेत मिळणार. ‘वारिसू’ नंतर, विजय लोकेश कनागराज सोबत विक्रम ब्रह्मांडचा एक भाग असल्याची अफवा असलेल्या चित्रपटासाठी काम करण्याची शक्यता आहे. चित्रपटाचे तात्पुरते नाव ‘थालापथी 67’ आहे ठरवले आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा-
जाळ अन् धूर संगटच! क्रिती सेननचा पांढऱ्या रंगाच्या ड्रेसमध्ये राडा
‘पठाण’साठी दीपिकाने 15, तर जॉनने घेतले 20 कोटी, शाहरुखच्या मानधनाचा आकडा सरकवेल पायाखालची जमीन

हे देखील वाचा