Saturday, June 29, 2024

हॉलिवूडवर पसरली शोककळा! जेरी ली लेवीसने 87व्या वर्षी मिटले डोळे…

मनोरंजन क्षेत्रामधून एक दु:खद बातमी समोर येत आहे. शनिवार (दि. 29 ऑक्टोंबर) दिवशी हॉलिवूडचे दिग्गज अमेरिकन गायक जेरी ली लेविस यांनी 87व्या वर्षी आपल्या राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून जेरी आजारी असल्याने त्यांचा घरामध्ये इलाज सुरु होता. ते अनेक दिवसांपासून आपल्या आजारपणाला झुंज देत होते मात्र, आज त्यांन आपले डोळे मिटले . त्यामुळे कला क्षेत्रामध्ये शोककळा पसरली आहे.

दोन दिवसांपूर्वीच जेरीच्या निधनाची बातमी समोर आली होती, त्यामुळे संगित क्षेत्रामध्ये खलबळ अडाली होती. मात्र, तेव्हा जेरी जिवंतच असून स्वत: त्यांच्या कुटुंबानेच ही बातमी दिली होती आणि निधनाच्या बातमीला अफवा सिद्ध केले होते पण, आता मात्र, जेरी ली लेविस (jerry Lee Lewis) खरंच गेले आहेत. त्यामुळे त्यांच्या चाहत्यांना धक्का बसला असून ते खूप दु:खी आहेत.

बॉलिूड इंडस्ट्रीचे प्रसिद्ध गायक अदनान सामी (Adnan Sami) याने जेरी ली यांना श्रद्धांजली वाहिली आहे. आपल्या अधिकृत ट्वीटर अकाउंटवरुन पोस्ट शेअर करत जेरी ली ली श्रद्धांजली दिली आहे. शेअर केलेल्या पोस्टमध्ये अदनान सामीने लिहिले होते की, हे ऐकूण खूप दु:ख झाले की, रॉक अ‍ॅंड रोल चे मुळ गॉडफादर, जेरी ली लेविस यांचे निधन झाले आहे. ते निःसंशयपणे एक पायनियर होते, त्यांना ‘द किलर’ हे टोपणनाव मिळाले. ते माझ्यासाठी अनेक अर्थांनी मोठा प्रेरणास्थान होते. त्यांना शांती मिळो.’

जेरी ली आपल्या कामापेक्षा वैयक्तीक आयुष्यामुळे खूपच चर्चेत होते. त्यांनी एक-दोन किंवा तीन नाही तर तब्बल सात वेळा लग्न केले आहे. तेव्हा ते खूपच वादामध्ये आले असून त्यांचे करिअर देखिल संपले होते. त्यांनी आपल्या 13 वर्षाच्या बहिणीसोबतही लग्न केले होते, ज्यामुळे ते खूपच ट्रोल झाले होते. त्याशिवाय ते आधिच विवाहित होते. ज्यामुळे त्यांचे अनेक कार्यक्रम रद्द करण्यात आले आणि रेडिओवरुन त्यांना ब्लॅक लिस्टमध्ये टाकले गेले.

जेरी ली यांनी 1950 मध्ये खूप चर्चेत आले होते. त्यांनी स्वत:ला रॉक रिबेलच्या रुपात म्युजिक इंडस्ट्रीमध्ये उतरवले होते. त्यांच्या अनेक गाण्यांनी चाहत्यांचे मनं जिंकले आहेत, त्याशिवाय त्यांची स्टाइलने दिखिल प्रेक्षकांवर भुरळ घातली आहे. 1958 मध्ये त्यांच्या करिअरली पुर्ण विराम लागला होता, याचे कारणही त्यांचे लग्न होते. एवढे वादग्रस्त आणि प्रसिद्ध गायकाने शनिवारी ( दि. 28 ऑक्टोंबर) रोजी 87व्या वर्षी जगाला राम राम ठोकला.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-
बिग बॉसच्या मंचावर परतला सलमान, विकेंडवारमध्ये अंकित आणि सुंबुलची लागली क्लास
‘मी नेहमी तयाच गोष्टीची भविष्यवाणी करते…,’ म्हणत कंगनाने ट्वीटर अकाउंटवर परतल्याचा व्यक्त केला आनंद

हे देखील वाचा