Sunday, March 16, 2025
Home टेलिव्हिजन बिग बॉसच्या मंचावर परतला सलमान, विकेंडवारमध्ये अंकित आणि सुंबुलची लागली क्लास

बिग बॉसच्या मंचावर परतला सलमान, विकेंडवारमध्ये अंकित आणि सुंबुलची लागली क्लास

लोकप्रिय कार्यक्रम ‘बिग बॉस‘ यावेळेस वेगळ्याच अंदाजात पार पडत आहे. नव्या सिजनपनमध्ये रोज काहीतरी नवीन पाहायला मिळत आहे. कहि दिवसापासून या कार्यक्रमाचा सुत्रसंचालक अभिननेता सलमान खान आजारी असल्यामुळे तो दिसेनासा झाला होता मात्र, शुक्रार (दि.28 ऑक्टोंबर) रोजी सलमाने बिग बॉसच्या मंचावर पुरागमन केले आणि घरातील अनेक स्पर्धकांवर फटकार लावली.

बिग बॉसच्या घरात विकेंडवारमध्ये चांगलाच धमाका पाहयला मिळाला. आधीतर सगळ्यात आनंदाची गोष्ट म्हणजे कार्यक्रमाचा सुत्रसंचालक सलमान खान (Salman Khan) आपल्या दमदार अंदाजात येऊन त्याने सदस्यांची चंगलीच फजीती केली. शुक्रवारी प्रसारित झालेल्या भागामध्ये बिग बॉसने घरातील सदस्यांना एक टास्क दिला होता ज्यामध्ये घरातील अशा दोन सदस्यांची निवड करायची होती ज्यांना घरामध्ये एका संरक्षकाची गरज आहे. तेव्हा घरातील सगळ्या सदस्यांनी सुंबुल तौकीर (Sumbul Taukir) आणि अंकित गुप्ता (Ankit Gupta) या दोघांची निवड केली. या दोघांना मला संरक्षकाची गरज ईआहे आशा बोर्डपशी बसवले. यानंत सगळ्या सदस्यांना एकत्र केल्यांनतर सलमानने सुंबुलला फटकावले आणि एवढ्या चेतावणी देऊनही बिग बॉसच्या घरामधून गायब राहिलेल्या अंकितलाही चांगलीच फटकार लावली.

सुंबलला फटकार लावत सांगितले की, “जी घराबाहेर आपल्या संरक्षकाचे ऐकत नाही ती घरामध्ये संगरक्षक शोधत आहे. एका काळामध्ये तु फक्त एक उदाहरण बणून राहिली आहेस. तु अशा व्यक्तीसारखी दिसत आहे, जी मागे पडलेली, सतत रडत राहणारी आणि तक्रार करत राहते. तु बिग बॉसच्या प्रत्येक भागामध्ये मागेच दिसत आहेस. घरामध्ये जाण्यापूर्वी बिग बॉसच्या मंचावर मोठ मोठ्या गोष्टी करणारी व्यक्ती आज घरातील एक कमकुवत स्पर्धकाच्या भूमिकेत दिसून येत आहे.”

salman khan
photo courtesy you tubeShazaan Gaming

अंकित गुप्तावर भडकाताना सलमानने सांगितले की, “मिस्टर अंकित गुप्ता तु कार्यक्रमामध्ये का आला आहेस? अंकित म्हणतो की, मी हा कार्यक्रम जिंकण्यासाठी आलो आहे. त्याचे उत्तर ऐकल्यानंतर सलमान बोलतो की, तुझ्या बोलण्यामध्ये हिंम्मतच दिसत नाही. इथे कोणी तुला बंदी करुन आणले नाही तु तुझ्या मनाने आला आहेस, पण तुला पाहून असे वाटत आहे की, तुला इथे राहायचे नाही. तु एक स्मार्ट आणि मजबूत व्यक्ती आहेस, ज्याला आता जागं केलं पाहिजे आणि बरोबरीने भाग घेतला पाहिजे.”

ankit gupta 2
photo courtesy you tubeShazaan Gaming

सलमानने सुंबुल आणि अंकितच्या मनातील लपलेला आत्मविश्वास जागा करण्याचा प्रयत्न केला आहे, कारण हे खूप चांगले खेळू शकतात पण यांच्या अशा वर्तवणूकीमुळे सलमानने यांना चांगलेच फटकारले आहे. आता हे पाहणे खूप महत्वाचे ठरणार आहे की, सुंबुल आणि अंकितमध्ये सलमानने सांगितलेल्या गोष्टीचा किती फरक पडतो.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-
‘मी नेहमी तयाच गोष्टीची भविष्यवाणी करते…,’ म्हणत कंगनाने ट्वीटर अकाउंटवर परतल्याचा व्यक्त केला आनंद
‘लग्न झाल्यावर गोष्टी बदलतात म्हणूनच आम्ही…’, म्हणत पुलकितने केले त्याच्या आणि कृतीच्या लग्नावर भाष्य

हे देखील वाचा