Friday, December 8, 2023

‘पुढचा प्रवास खडतर असेल, तर…’, म्हणत अमेय वाघने वाढदिवशी स्वतःलाच दिलेली ‘ही’ खास भेट

आपला वाढदिवस हा आपणा सर्वांसाठीच खूप खास असतो. यादिवशी मिळणाऱ्या शुभेच्छा तर मन खुश करून टाकतात. तसे पाहायला गेले, तर या खास दिनी आपले नातेवाईक, मित्रमंडळी, कुटुंब आपल्याला भेटवस्तू देत असतात. मात्र मराठमोळ्या अमेय वाघने स्वतःलाच एक खास भेटवस्तू दिली होती. सोमवारी (13 नोव्हेंबर) अमेय त्याचा वाढदिवस साजरा करत आहे.

संजय जाधव आणि दीपक राणे यांची ‘दिल दोस्ती दुनियादारी’ चांगलीच गाजली. या मालिकेने तर नाव कमावलेच, सोबत यातील कलाकारांना देखील अमाप प्रसिद्धी मिळवून दिली. यातले कैवल्यचे म्हणजेच अमेय वाघचे पात्र विशेष भाव खाऊन गेले. श्रीमंत बापाचा मुलगा आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी कशाप्रकारे बाहेर पडतो आणि अनोळखी लोकांसोबत राहू लागतो. हेच अनोळखी लोकं पुढे एकमेकांना जीव लावणारे मित्र बनतात. (amey wagh gifted something special to himself on his birthday)

अमेय आता अभिनयाप्रमाणेच सोशल मीडियावरही तितकाच सक्रिय असतो. दरदिवशी पोस्ट शेअर करून तो चाहत्यांच्या संपर्कात राहतो. आज अमेय त्याचा वाढदिवस साजरा करत आहे. त्याच्या या खास दिनी त्याने स्वतःलाच एक गिफ्ट दिले आहे. यासंबंधित पोस्ट त्याने सोशल मीडियावर शेअर केली आहे. हा फोटो आणि त्याखालील कॅप्शन चांगलेच चर्चेत आले आहे.

नुकताच अमेयने इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. यामध्ये तुम्ही पाहू शकता की, अभिनेत्याने स्वतःला एक चारचाकी गाडी भेट दिली आहे. वाढदिवसादिनी त्याने निळ्या रंगाची मर्सडीझ कार खरेदी केली आहे. यात अमेय त्याच्या नव्या गाडीच्या बाजूला उभा राहून फोटोसाठी पोझ देत आहे. फोटो शेअर करत अमेय म्हणतोय की, “पुढचा प्रवास खडतर असेल, तर तो मर्सडीझने करावा म्हणतोय! माझ्या वाढदिवशी मी स्वतःला नवी कार गिफ्ट दिली आहे.” चाहत्यांना हे मजेदार कॅप्शन खूपच पसंत पडले आहे. शिवाय चाहते आणि कलाकार त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत.

अमेयच्या कामाबद्दल बोलायचे झाले, तर त्याने विविध माध्यमातून चाहत्यांचे भरभरून मनोरंजन केले आहे. नाटक, मालिका, चित्रपट शिवाय वेब सिरीजमध्ये देखील तो झळकला आहे. ‘मुरांबा’, ‘फास्टर फेणे’, ‘धुराळा’ या चित्रपटातील अमेयच्या अभिनयाचे विशेष कौतुक झाले. अभिनेता आगामी काळात ‘झोंबिवली’मध्ये दिसणार आहे. त्याचा हा बहुप्रतिक्षित चित्रपट पुढच्या वर्षी 4 फेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
प्रेक्षकांचा थिएटरमध्ये राडा, सलमानच्या चाहत्यांनी फटाके फोडून घातला गोंधळ; व्हिडिओ व्हायरल
‘…आणि हे मराठी कलाकार’, टीका करणाऱ्या नेटकऱ्यावर संतापली हेमांगी कवी; म्हणाली…

हे देखील वाचा