‘दिल दोस्ती दुनियादारी’ मधील कैवल्य तर तुमच्या लक्षात असेलच. तोच कैवल्य जो त्याच्या सेन्स ऑफ ह्युमरने सर्वांना चकित करायचा. या मालिकेतील त्याच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले. शिवाय त्याला प्रसिद्धीच्या शिखरावर पोहचवले.
कैवल्य अर्थातच अभिनेता अमेय वाघ आता सोशल मीडियावर खूप सक्रिय असतो. याठिकाणी तो त्याचे फोटो शेअर करून चाहत्यांचे लक्ष वेधत असतो. फोटो म्हणण्यापेक्षा त्याखालचे कॅप्शनच अधिक लक्षवेधी असते, असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. नुकताच अमेयने शेअर केलेला एक फोटो, त्याच्या कॅप्शनमुळेच चर्चेत आला आहे.
अमेयने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर त्याचा एक फोटो शेअर केला आहे. यात त्याने काळ्या रंगाचा शर्ट घातला आहे, ज्यामध्ये तो बराच हँडसमही दिसत आहे. सोबतच त्याने डोळ्याला लाल रंगाचा गॉगल लावला आहे. या गॉगलला अनुसरूनच त्याने एक मजेदार कॅप्शन या फोटोला दिलं आहे.
फोटोखाली कॅप्शनमध्ये अमेय म्हणतोय की, “माझा बालपणीचा हिरो मिस्टर इंडिया याला शोधताना मी!” हे मजेदार कॅप्शन नेटकऱ्यांना खूप आवडलं आहे. चाहत्यांसोबतच कलाकारही यावर प्रतिक्रिया देत आहेत. विकी कौशलने यावर कमेंट करत लिहिलंय, “अमेय स्वॅग.” तर रितेश देशमुख विचारतोय की, “सापडला का?” तसेच इतर युजर्सही ही पोस्ट पाहून लोटपोट झाल्याचे पाहायला मिळत आहे. (amey wagh shared photo with funny caption see)
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-अली गोनीकडे सध्या नाहीये कोणताच प्रोजेक्ट; वाढलेलं वजन आहे का यामागचं कारण??