अली गोनीकडे सध्या नाहीये कोणताच प्रोजेक्ट; वाढलेलं वजन आहे का यामागचं कारण??


कलाकार नेहमीच स्क्रीनवर फिट आणि उत्तम दिसावे यासाठी कठोर मेहनत घेतात. कधी कधी कामातून घेतलेल्या ब्रेकमुळे तर कधी इतर कारणांमुळे कलाकारांच्या वजनात फरक पडत असतो. स्वतः ला मेंटेन ठेवण्यासाठी कलाकार खूप कष्ट घेतात. सोबतच या क्षेत्रात काम मिळवण्यासाठी आणि टिकण्यासाठी फिट राहणे खूप महत्वाचे आहे. याला टेलिव्हिजनवरील कलाकार देखील अपवाद नाही.

सध्याच्या टीव्ही इंडस्ट्रीमधील सर्वात हिट आणि लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक म्हणजे अली गोनी. स्टार प्लसच्या प्रसिद्ध ‘ये हैं मोहब्बते’ मध्ये अलीने दुसरी महत्वाची भूमिका साकारली होती. या भूमिकेने त्याला तुफान लोकप्रियता आणि प्रसिद्धी मिळवून दिली. मात्र बिग बॉसमध्ये त्याने स्पर्धक म्हणून एन्ट्री घेतली, त्यानंतर त्याच्या लोकप्रियतेत अमाप वाढ झाली. बिग बॉसमधून बाहेर आल्यानंतर अली सध्या कुठे दिसला नाही. अशा चर्चा आहे की तो सध्या त्याच्या वजनामुळे कुठेच दिसत नाही.

अलीने एक मुलाखतीमध्ये यावर भाष्य करताना सांगितले की, “आता मला कोणत्याही प्रोजेक्टसाठी होकार द्यायला कोणतीही घाई नाहीये. माझे मागचे दोन प्रोजेक्ट्स म्हणजे ‘खतरो के खिलाडी’ आणि ‘बिग बॉस’ या दोन रियॅलिटी शोमध्ये मी काम केले. बिग बॉसने मला माझ्यातली प्रतिभा, माझ्यातले गुण, दोष इतरांना आणि मुख्य म्हणजे मला देखील समजावून घेण्याची संधी दिली. सध्या मला टीव्ही आणि ओटीटीवरून काही ऑफर येत आहे, मात्र मी अजून कोणालाही होकार दिला नाहीये.”

वजनावर बोलताना तो म्हणाला, “काही दिवसांपूर्वीच मी कोरोना पॉझिटिव्ह झालो होतो. त्यादरम्यान माझ्या फिटनेसमध्ये गडबड झाली. सध्या मी स्वतःला शेपमध्ये आणण्यासाठी प्रयत्न करत आहे. जोपर्यंत मी माझी फिटनेस मिळवत नाही, तोपर्यंत मी कोणत्याही नवीन ऑफर घेणार नाहीये. मला कोरोनाच्या काळात छातीमध्ये स्टेरॉयड दिले गेले होते. त्यामुळे माझे वजन झपाट्याने वाढत आहे. आता मी योग्य डाएट आणि व्यायाम करत आहे.”

काही मीडिया रिपोर्टनुसार अली कोरोनाच्या संसर्गामुळे शूटिंगच्या सेटवर जायला घाबरत आहे. तत्पूर्वी तो काही दिवसांपूर्वी पॉझिटिव्ह झाला होता, मात्र परिवाराच्या पाठिंब्यामुळे तो लवकरच यातून बाहेर आला.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-क्रिती सेननच्या ‘मिमी’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीझ; प्रेक्षकांकडून मिळतोय तूफान प्रतिसाद

-महाराष्ट्रातल्या मातीतला एक खलनायकी अन् रांगडा चेहरा ‘निळू फुले’; उत्कृष्ट अभिनयाच्या जोरावर गाजवलीत त्यांनी चार दशकं

-‘जाने क्या बात है!’ अन्विताने शेअर केला ‘ओम-स्वीटू’चा रोमँटिक फोटो; चाहत्यांमध्ये रंगलीय एकच चर्चा


Leave A Reply

Your email address will not be published.