Monday, June 9, 2025
Home बॉलीवूड ‘कौन बनेगा करोडपती’ सेटवर खुलले प्रेमाचे रंग, क्रिती सेननने गुडघ्यावर बसत केली अमिताभ बच्चन यांना…

‘कौन बनेगा करोडपती’ सेटवर खुलले प्रेमाचे रंग, क्रिती सेननने गुडघ्यावर बसत केली अमिताभ बच्चन यांना…

आपल्या अभिनयाने ८० च्या दशकापासून ज्यांनी प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे, असे अभिनेते म्हणजे ‘महानायक’ अमिताभ बच्चन होत. नुकतेच काही दिवसांपूर्वी बिग बी यांनी ८० व्या वर्षात पदार्पण केले आहे. परंतु त्यांच्यातील जोश आणि कामाप्रती असलेला उत्साह अनेक तरुणांना लाजवेल असा आहे. या वयात देखील ते शूटिंग करतात. यासोबत ते सोशल मीडियावर देखील मोठ्या प्रमाणात सक्रिय असतात. त्यांचे फोटो आणि व्हिडिओ ते दररोज शेअर करून चाहत्यांशी जोडून राहत असतात. अशातच त्यांनी बॉलिवूड अभिनेत्री क्रिती सेनन हिच्यासोबत एक रोमँटिक डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

अमिताभ बच्चन हे सध्या ‘कौन बनेगा करोडपती’ या शोचे शूटिंग करत आहेत, तर क्रिती सेनन आणि राजकुमार राव हे ‘कौन बनेगा करोडपती’ या शोमध्ये गेले आहेत. यात क्रिती सेनन अमिताभ बच्चन यांना गुडघ्यावर बसून डान्ससाठी विचारते आणि त्यांच्यासोबत रोमँटिक डान्स देखील करते. (Amitabh Bachchan and Kriti senon romantic dance on kaun banega crorepati set)

अमिताभ बच्चन यांनी सोनी टीव्हीवर शेअर केलेल्या या व्हिडिओला रिपोस्ट केले आहे. या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो की, क्रिती लाल रंगाच्या सुंदर लाँग ड्रेसमध्ये दिसत असून, अमिताभ बच्चन यांनी काळ्या रंगाचा सूट घातला आहे. ते दोघेही अत्यंत सुंदर डान्स करताना दिसत आहे. ते दोघे डान्स करत असताना राजकुमार राव बाजूला उभा राहून त्यांना बघत आहे. या व्हिडिओच्या बॅकग्राउंडला क्रिती सेननच्या ‘लुकाछुपी’ चित्रपटातील ‘दुनिया’ हे गाणे लागले आहे.

त्यांचा हा एपिसोड शुक्रवारी (२९ सप्टेंबर) सोनी टीव्हीवर प्रसारित केला जाणार आहे. हा प्रोमो पाहून प्रेक्षकांना हा एपिसोड बघण्याची उत्सुकता लागली आहे. अनेकजण या फोटोवर त्यांच्या प्रतिक्रिया देत आहेत. याआधी देखील बिग बी यांनी क्रिती सेननसोबत एक फोटो शेअर केला होता. त्या फोटोला देखील चाहत्यांनी खूप चांगला प्रतिसाद दिला होता.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

‘माझ्यासोबत एका दिग्दर्शकाने सेटवरच केली होती शिवीगाळ’, ईशा गुप्ताचा खुलासा

अमिताभ बच्चन यांचा ‘हा’ फोटो पाहिल्यावर तुम्ही देखील नक्कीच म्हणाल, ‘वय हा फक्त आकडा आहे’

‘कोणाचीही मुलगी, बहीण किंवा आई असूदे, मी तिच्याशीच लग्न करणार’, वाचा परेश रावल यांची लव्हस्टोरी

हे देखील वाचा