Wednesday, July 3, 2024

ऋतिक आणि शाहरुख सारख्या आभिनेत्यांना 80 च्या वयात टक्कर देणारे अमिताभ, लहान मुलांच्या मनावरही करतात राज्य

बॉलिवूड इंडस्ट्रीचे दिग्गज कलाकार अभिताभ बच्चन ( Amitabh Bachchan) यांनी आपल्या दमदार अभिनयाने कलाविश्वात  एक वेगळीच छाप सोडली आहे. आजही लोक त्यांच्या आदाकराचे कौतुक करत असतात. त्यांची डायलॉग बोलण्याची पद्धत आणि त्यांची कॉमेक टइमिंगने तर आजचे तरुन पिढी आणि वयस्कर लोकांपर्यत त्यांचे चाहते आहेत. ते 80 च्या वयात असूनही त्यांचा दमदार अंदाज पाहून लहान मुलेही त्यांचे फॅन झाले आहेत. आज आपण त्यांच्या अशा चित्रपटाविषयी माहिती जाणून घेणार आहोत जे लहान मुलांपासून ते वयस्कर माणसाला आपला फॅन बनवले आहे.

मिस्टर नटवरलाल
अभिनेता अमिताभ बच्चन यांचा चित्रपट ‘मिस्टर नटवरलाल’ हा 1979 मध्ये प्रदर्शित झाला होता, ज्याची स्टोरी फसवणूकरीवर अवलंवून आहे. या चित्रपटामध्ये त्यांच्यासोबत मुख्या भुमिकेत रेखा होती. या चित्रपटामध्ये एक गाणे होते ते म्हणजे ‘मेरे पास आओ मेरे दोस्तो’ हे लहान मुलांवर आधारित होते. गाण्याच्या माध्यमातून अभिनेता स्वत:ची माहिती म्हणजेच तो जंगलात फसला आहे ही माहीती या गाण्याद्वारे देत असतो. त्यावेळी हे गाणे लहान मुलांचे आवडते गाणे होते.

भूतनाथ
भूतनाथ हा चित्रपट हॉरर कॉमेडी आहे, ज्यामध्ये अभिताभ यांनी भूताची भूमिका केली होती. यामध्ये हा चित्रपट 2008 साली प्रदर्शित झाला होता. यामध्ये एका बंकू नावाचा लहान मुलासोबत अभिनेता मैत्री करतात. या चित्रपटामध्ये जुही चावला (Juhi Chawla) , शाहरुख खान (Sharukh Khan), आणि अमन सिद्दीकी (Aman Siddiqui) आहे.

झुंड
झुंड हा चित्रपट याच वर्षी प्रदर्शित झाला असून एक बायोपिक आहे जो विजय बर्से यांच्या स्पोर्ट स्टोरीवर आधारित आहे. या चित्रपटामध्ये बिग बी एका स्पोर्टमॅनच्या भूमिकेत दाखवले आहेत. यामध्ये अभिनेता काही स्लम येरियातील मुलांना घेऊन आपली फुटबॉल टीम बनवतात. या चित्रपटामध्ये रिंंकू राजगुरु (Rinku Rajguru) आणि आकाश ठोसर (Akash Thosar) या कलाकारांना मुख्य भुमिकेत दाखवले आहे. या चित्रपटाद्वारे गरीब मुलांच्या आतमधल्या कौशल्याला उजाळा दिला आहे, जे काही लोक त्यांना त्यांचे कौशल्य दाखवण्याची संधी देत नाहीत. त्यामुळे अभिनेता स्वत: त्यांना मैदानी खेळाची तयारी करुन त्यांना मोठ्या स्पर्धेमध्ये सहभागी करुन देतात.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
अगं जरा दमानं! राखीला बनायचंय मुख्यमंत्री; म्हणाली, ‘मला मुंबईतले रस्ते हेमा मालिनींच्या कंबरेसारखे…’
अरुण बाली यांच्या निधनाने पूर्णपणे तुटली नीना गुप्ता; भावूक पाेस्ट चर्चेत

हे देखील वाचा