Tuesday, July 23, 2024

निसर्गाच्या सानिध्यात राहणायची इच्छा व्यक्त करणारा आकाश ठोसर रमला नारळाच्या बागांमध्ये

सोशल मीडिया आणि कलाकार यांचे खूपच सुंदर आणि युनिक असे नाते आहे. याच सोशल मीडियामुळे कलाकार त्यांच्या फॅन्सच्या तर फॅन्स कलाकारांच्या संपर्कात असतात. सोशल मीडियाचा वापर आता तर प्रसिद्धी मिळवण्यासाठी आणि सतत लोकांच्या स्मरणात राहण्यासाठी केला जातो. या सोशल मीडियावर कलाकार सक्रिय राहण्यासाठी काही ना काही पोस्ट करताना दिसतात. सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या अभिनेत्यांपैकी एक अभिनेता म्हणजे आकाश ठोसर. ‘सैराट’ सिनेमातून रातोरात स्टार झालेला आकाश सर्वांनाच परिचयाचा आहे. या सिनेमात त्याने साकारलेली ‘परशा’ ही भूमिका आजही लोकांच्या लक्षात आहे. या सिनेमामुळे आकाशला तुफान लोकप्रियता आणि प्रसिद्धी मिळाली. आजही काही लोकं त्याला परशा म्हणूनच ओळखता. याच आकाशने नुकताच त्याचा एक व्हिडिओ इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे.

आकाशने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये तो झाडावरून नारळ काढताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये आकाश एका मोठ्या काठीच्या सहाय्याने झाडावरील नारळा तोडण्याचा प्रयत्न करतो, अशातच दोन नारळ खाली पडतात ते पाहून आकाश खुश होतो आणि ते पडलेले नारळ उचलून फोडतो. नारळ फोडल्यानंतर तो लगेचच त्यातले पाणी पितो आणि नारळात असलेली मलाई खातो. हा व्हिडिओ शेअर करताना आकाशने कॅप्शनमध्ये लिहिले, “माझी अशी इच्छा आहे की मी असेच सदैव निसर्गाच्या सान्निध्यात शांतपणे राहावे.” यावरूनच आकाशला गावाकडे राहणे आणि तिथलं जीवन जगणे किती आवडते याचा अंदाज आपल्याला येईल.

आकाशच्या या व्हिडिओवर अनेक कलाकार आणि फॅन्सने भरभरून कमेंट्स करत त्याचे कौतुक केले आहे. काही दिवसांपूर्वीच आकाशच बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित असा नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘झुंड’ सिनेमा प्रदर्शित झाला होता. या सिनेमात अमिताभ बच्चन यांनी मुख्य भूमिका साकारली होती, याशिवाय रिंकू राजगुरू देखील सिनेमात महत्वाच्या भूमिकेत होती. सैराट सोबतच आकाश अनेक हिंदी वेबसिरीजमध्ये देखील झळकला आहे. यासोबतच तो महेश मांजरेकर यांच्या ‘फ्रेंडशिप अनलिमिटेड’ चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसला होता.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

हे देखील वाचा