Tuesday, July 9, 2024

‘केबीसी’ला २१ वर्षे पूर्ण: ‘बिग बीं’नी दिला जुन्या आठवणींना उजाळा; तर नव्या पर्वात दिसणार अधिक जोश अन् उत्साह

बिग बी अमिताभ बच्चन हे कला विश्वातील ज्येष्ठ अभिनेते आहे. आपल्या अभिनयाच्या कारकिर्दीत त्यांनी करोडो प्रेक्षकांची मने जिंकली. भारदस्त आवाज आणि सहा फूट उंच असलेल्या महानायक अमिताभ बच्चन हे त्यांच्या अभिनयातून गेली अनेक दशकं प्रेक्षकांचे मनोरंजन करणारे अमिताभ बच्चन गेल्या अनेक वर्षांपासून ‘कौन बनेगा करोडपती’ या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करत आहेत. लवकरच या शोचे १३वे पर्व सुरू होणार आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या कोरोना महामारीमुळे सर्व शूटिंगसाठी निर्बंध आणि अटी लावण्यात आल्या होत्या. परंतु आता सर्वत्र नियम काही प्रमाणात शिथिल केले असून सर्व चित्रीकरणाची कामे सुरू झाली आहेत.

“कौन बनेगा करोडपती”च्या या पर्वात अनेक नवनवीन गोष्टी आणि बरेच बदल पाहायला मिळणार आहेत. सेटवरती ह्यावेळेस एलईडी पाहायला मिळणार आहेत. तसेच प्रश्न विचारल्यावर सुरू होणाऱ्या टाईमरचे नाव बदलून ते आता “धुक धुकी जी” असे ठेवण्यात आले आहे. नाव जितके मजेशीर वाटत आहे तितकाच मजेशीर हा खेळ रंगणार आहे. या पर्वात करोडपती होण्याचा मार्ग देखील अवघड करण्यात आला आहे. आता हॉटसीटवर जाण्यासाठी तीन प्रश्नांची अचूक उत्तरे देणे अनिवार्य झाले आहे. विशेष म्हणजे प्रेक्षकांची मदत लाईफ लाईन यावेळी सुरू करण्यात आली आहे.

या शोच्या शूटिंगवेळी सेटवर अमिताभ बच्चन यांनी या शोचे करते धरते अर्थातच सिद्धार्थ बासू यांचे आभार मानले. सिद्धार्थ बासू यांना भारतीय दूरदर्शन क्विझिंगचे जनक मानले जाते. ‘कौन बनेगा करोडपती’ शोला ह्यावर्षी २१वर्षे पूर्ण झाली आहेत. या शोच्या शूटिंग दरम्यान अमिताभ यांनी सिद्धार्थ बासू यांच्या बद्दल सांगितले, “सिद्धार्थ बासू शो मध्ये बारीक बारीक गोष्टींवर सुद्धा जास्त बारकाईने लक्ष देतात.” यावेळी बिग बी सिद्धार्थ बासू यांच्या रॅपिड फायर प्रश्न या खेळातसुद्धा सहभागी झाले. केबीसी हा शो बहुचर्चित आंतरराष्ट्रीय शो ‘हूं वांट्स टू बी ए मिलेनियर चे भारतीय व्हर्जन आहे. हा शो सुरू होण्यापूर्वी अमिताभ बच्चन यांनी स्वतः सेटवर पोहचून सेट बद्दल सर्व माहिती आणि नवीन बदल जाणून घेतले होते.

या शोला २१ वर्ष पूर्ण झाले आणि १२ पर्व झाले आहेत, मात्र या केबीसीमध्ये कधीच विचारलेला प्रश्न पुन्हा विचारला गेला नाहीये. सर्व सूचना आणि पर्यायांसह असलेले प्रश्न एका डेटाबेसमध्ये टाकले जातात. याच प्रश्नांमधून कॉम्पुटरद्वारे कोणतेही १५ प्रश्न विचारले जातात.

 

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-रक्ताच्या नात्यापलीकडे जाऊन ‘हे’ कलाकार आपल्या भावा- बहिणींसोबत साजरे करतात रक्षाबंधन

‘माझ्याशी नीट बोलायचं हं…!’ म्हणत प्राजक्ताने अतिशय हटके अंदाजात भावाला दिल्या रक्षाबंधनाच्या शुभेच्छा

‘रियल’ लाइफ भावाबहिणींच्या जोड्या, ज्या गाजवतायेत मोठा पडदा; तर ‘या’ कलाकारांचा आहे यादीत समावेश

हे देखील वाचा