Tuesday, September 17, 2024
Home बॉलीवूड रक्ताच्या नात्यापलीकडे जाऊन ‘हे’ कलाकार आपल्या भावा- बहिणींसोबत साजरे करतात रक्षाबंधन

रक्ताच्या नात्यापलीकडे जाऊन ‘हे’ कलाकार आपल्या भावा- बहिणींसोबत साजरे करतात रक्षाबंधन

बहिण भावाच्या प्रेमाचा हा अतूट सोहळा चित्रपट सृष्टीतील कलाकार देखील साजरा करतात. रक्ताच्या नात्या पलिकडे देखील अनेक मानलेली नाती असतात. आपल्याकडे अनेकदा असे म्हटले जाते की, रक्ताच्या नात्याइतकीच प्रेमाची नाती महत्वाची असतात. बॉलिवूडमध्ये देखील अशाच काही मानलेल्या भावाबहिणींच्या जोड्या जाणून घेऊया अशाच काही जोड्यांबद्दल..

अर्जुन कपूर- कॅटरिना कैफ
अंशुला कपूर ही अर्जुनची सख्खी बहीण आहे. दोघांचे एकमेकांसोबत खूपच चांगले बाँडिंग आहे. दरवर्षी हे दोघं एकत्र रक्षाबंधन साजरा करतात. बॉलिवूडमधील सुंदर अभिनेत्री कॅटरिना कैफ ही अर्जुनची मानलेली बहीण आहे. हे दोघे चांगले मित्र असून अर्जुन चित्रपटांमध्ये येण्याआधीपासून ते दोघे रक्षाबंधन साजरा करतात. या भावा- बहिणीची जोडी इंडस्ट्रीमध्ये खूप प्रसिद्ध आहे.

बिपाशा बासू- मेकअप आर्टिस्ट
बिपाशा आपल्या आई- वडिलांची एकुलती एक मुलगी आहे. तिला कोणीही भाऊ नाही त्यामुळे चित्रपटसृष्टीतील कलाकार आणि इथे असलेल्या व्यक्ती या सर्वांशी ती बहीण भावांचे नाते जोडण्याच्या प्रयत्नात असते. जॉन आणि बिपाशा जेव्हा एकत्र होते, तेव्हा ती जॉनच्या मेकअप आर्टिस्टला राखी बांधायची. आजही बिपाशा त्याला राखी बांधते.

ऐश्वर्या राय- सोनू सूद
विश्वसुंदरी असणाऱ्या ऐश्वर्याने सोनू सुदसोबत ‘जोधा अकबर’ या चित्रपटात काम केले. तेव्हापासूनच या दोघांमध्ये बहीण- भावाचे नाते तयार झाले आहे. ऐश्वर्या सोनूला तिचा भाऊच मानते. चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान ऐश्वर्याने त्याला राखी बांधली होती. रक्ताचे नाते नसूनही हे दोघे दरवर्षी रक्षाबंधन उत्साहात साजरा करतात.

Photo Courtesy Instagramsonusood and aishwaryaraibachhan

 

सलमान खान- श्वेता रोहिया
बॉलिवूडमध्ये सलमान खान ‘भाईजान’ या नावाने ओळखला जातो. सलमानचे त्याच्या कुटुंबीयांशी आणि खासकरून त्याच्या बहिणींशी खूपच जिव्हाळ्याचे नाते आहे. तो त्याच्या सख्या बहिणीबरोबर रक्षाबंधन साजरा करतोच, परंतु तो आपल्या मानलेल्या बहिणीसोबतही तितक्याच उत्साहाने आणि आनंदाने दरवर्षी न विसरता रक्षाबंधन साजरे करतो. श्वेता रोहिया ही त्याची मानलेली बहीण आहे.

श्वेता ही अभिनेता पुलकित सम्राटची पहिली पत्नी होती. सलमानने तर श्वेताचे कन्यादानही केले आहे.

हेही नक्की वाचा-
जमलं रे जमलं! मराठी सिनेसष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे अडकणार विवाह बंधनात; पाहा फोटो
रक्षाबंधन विशेष! भावंडांचे प्रेम दर्शविणाऱ्या ‘या’ चित्रपटांसह खास बनवा तुमचे रक्षाबंधन

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा