Saturday, June 29, 2024

‘ज्या वयात मुलं खेळायची, माझा मुलगा इंजेक्शन मोजायचा’, कँसरग्रस्त मुलाचे हाल ऐकून अमिताभही भावूक

टीव्हीवरील प्रसिद्ध शोमध्ये ‘कौन बनेगा करोडपती‘ या शोचाही समावेश होतो. या शोचे सध्या 14वे पर्व सुरू आहे. या शोमध्ये स्पर्धक नेहमीच होस्ट अमिताभ बच्चन यांच्यासोबत आपल्या गोष्टी शेअर करत असतात. नुकतेच शोमध्ये पश्चिम बंगालच्या दुर्गापूर येथून आलेल्या स्पर्धकाने पुलक कुमार सूर यांनी आपल्या मुलाच्या आजारपणाबद्दल अमिताभ यांना सांगितले. यावर बिग बी यांनी त्या स्पर्धकाला हिम्मत दिली आणि म्हटले की, ‘तुमची मेहनत नक्कीच फळाला येईल.’

कौन बनेगा करोडपतीमधील भावूक क्षण
बंगालच्या पुलक कुमार सूर (Pulak Kumar Sur) यांनी कोणत्याही लाईफलाईनशिवाय 60 हजार रुपये आपल्या नावावर केले होते. यानंतर अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनी एक विनंती मान्य करत स्पर्धकाचा मुलगा सौम्यदीप सूरसोबत व्हिडिओ कॉलवर संवाद साधला. त्याने सांगितले की, पुलक यांचे स्वप्न होते की, त्यांनी अमिताभ यांच्यासोबत केबीसी खेळावे. तो म्हणाला, “सर, मला तुम्हाला सांगायचं आहे की, वडिलांचे स्वप्न पूर्ण झाले आहे. सर आज मी खूप खुश आहे. वडिलांनीही आजपर्यंत जे काही केले आहे, ते माझ्यासाठी केले आहे.”

अमिताभ यांनी त्या मुलाचे बोलणे ऐकल्यानंतर पुलक यांना म्हटले की, “बापलेकामधील हे खूपच खास नाते आहे.” अमिताभ यांनी विचारताच पुलक म्हणाले की, “जेव्हा सौम्यदीप 7 वर्षांचा होता, तेव्हा त्याला मेंदूचा कर्करोग झाला होता. तो त्यातून बराही झाला नव्हता, तेव्हा समजले की तो कर्करोगाच्या चौथ्या स्टेजवर आहे.” असे बोलताच पुलक यांना अश्रू अनावर झाले. ते म्हणाले की, “या मुलाने त्याचे बालपण पाहिले नाही. खूप संघर्ष केला आहे. माझ्या पत्नीने खूप त्याग केला आहे. आम्ही लोकांनी दोन वर्षे सामान्य आयुष्य पाहिले नाहीये.”

‘मुलगा इंजेक्शन मोजायचा’
अमिताभ पुलकला म्हणाले की, “ही तुझ्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे.” यानंतर अमिताभ यांनी सौम्यदीपच्या आईशी संवाद साधला. त्यांनी विचारले की, “तुमच्यासाठी कसे राहिले?” आईचे बोलणे ऐकून अमिताभही भावूक झाले. सौम्यदीपची आई म्हणाली, “जेव्हा इतर मुले क्रिकेट खेळताना त्यांचे बॉल मोजत असत, त्यावेळी माझा मुलगा त्याचे इंजेक्शन मोजत असे. आम्ही खोटे सांत्वन करायचो बेटा, तू पण लवकर बरा होशील. त्याला शाळेत जाता येत नव्हते. कधी कधी असं वाटायचं की, हे सगळं संपेल किंवा सारं आयुष्य असंच संपेल. तो दिवस आपण कधीच विसरू शकत नाही.”

यानंतर अमिताभही भावूक झाले. ते म्हणाले की, “आम्ही सर्वजण प्रार्थना करतो की, हे दिवस लवकरात लवकर निघून जावे. ही तुमची तपस्या आहे, तुमच्या कष्टाचे फळ नक्की मिळेल.”

विशेष म्हणजे, पुलक कुमार सूर यांनी या शोमध्ये लाखो रुपये जिंकले. ते या शोमधून 12 लाख 50 हजार रुपये घेऊन गेले.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक वाचा-
श्रेयसचं नशीब फळफळलं! ‘पुष्पा’ने मिळवून दिल्या भरमसाठ ऑफर्स, पण अभिनेता म्हणाला…
पत्नी नताशाकडून हार्दिक पंड्याने घेतले डान्सचे धडे; व्हिडिओ पाहून नेटकरी म्हणाले, ‘चंपक चाचासारखा डान्स’

हे देखील वाचा