Friday, March 29, 2024

पत्नी नताशाकडून हार्दिक पंड्याने घेतले डान्सचे धडे; व्हिडिओ पाहून नेटकरी म्हणाले, ‘चंपक चाचासारखा डान्स’

सोशल मीडियाचा वापर सामान्य व्यक्तींपासून ते मोठमोठ्या सेलिब्रिटींपर्यंत सर्वजण करतात. विशेषत: क्रिकेटपटू, टीव्हीवरील कलाकार यांचा सोशल मीडियावर मोठा वावर असतो. ते दररोज नवनवीन फोटो आणि व्हिडिओ शेअर करत चाहत्यांचे मनोरंजन करत असतात. अशात आता प्रसिद्ध मॉडेल- अभिनेत्री नताशा स्टॅन्कोविक हिचा पती आणि क्रिकेटपटू हार्दिक पंड्या याच्यासोबतचा एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओत हार्दिक पंड्या नताशाकडून डान्स शिकण्याचा प्रयत्न करत आहे. हा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे.

नताशा स्टॅन्कोविक (Natasa Stankovic) ही हार्दिक पंड्या (Hardik Pandya) याला डान्स शिकवताना दिसत आहे. मात्र, क्रिकेटच्या मैदानात गोलंदाजांविरुद्ध चौकार-षटकार मारणाऱ्या पंड्याला हा सराव सोपे वाटत नसल्याचे दिसत आहे. चाहत्यांनीही या व्हिडिओवर त्यांची मजा घेतली आहे. एकाने त्यांची तुलना ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या शोमधील ‘चंपक चाचा’ (Champak Chacha) यांच्याशी केली आहे.

हार्दिक पंड्याने शेअर केला व्हिडिओ
हार्दिक पंड्या याने पत्नी नताशा स्टॅन्कोविक हिच्याकडून डान्स शिकताना व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ शेअर करत त्याने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “डान्सचे धडे इथूनच मिळतात.” या व्हिडिओवर चाहत्यांनी 12 लाखांहून अधिक लाईक्सचा वर्षाव केला आहे. तसेच, 3 हजारांहून अधिक कमेंट्सही केल्या आहेत. या व्हिडिओत दिसते की, पंड्याला स्टेप्स कॉपी करताना किती अडचण येत आहे. चाहतेही या गोष्टीवरून कमेंट्स करत आहेत.

हार्दिक पंड्या आणि नताशा स्टॅन्कोविक यांचा व्हिडिओ (Hardik Pandya And Natasha Stankovic Video) चाहत्यांना भलताच आवडल्याचे दिसत आहे. एकाने कमेंट करत लिहिले की, “पंड्या चंपक चाचासारखा डान्स करत आहे.” दुसऱ्या एकाने लिहिले की, “तू बॉलिवूडमध्ये काम करावं अशी माझी इच्छा आहे.”

सन 2020मध्ये झाले होते लग्न
हार्दिक पंड्या आणि नताशा स्टॅन्कोविक यांनी दीर्घ काळ एकमेकांना डेट केले. त्यानंतर त्यांनी सन 2020मध्ये लग्न केले. 4 मार्ज, 1992 रोजी सर्बियामध्ये जन्मलेली नताशा लग्नाच्या आधीच प्रेग्नंट होती. तिने सन 2020मध्ये एका मुलाला जन्म दिला होता. त्यांच्या मुलाचे नाव अगस्त्य असे आहे. (model natasa stankovic teaching dance to husband and cricketer hardik pandya see here)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक वाचा-
बापलेकाची जोडी सुसाट! मुलगा आझादसोबत थिरकला आमिर खान, व्हिडिओ जोरदार व्हायरल
फोटोत दिसणाऱ्या ‘या’ चिमुकलीला नाना पाटेकरांवर होतं जीवापाड प्रेम, नव्वदच्या दशकात गाजवलेलं बॉलिवूड

हे देखील वाचा