Wednesday, July 3, 2024

पापाचा विनाश करण्यासाठी हातात घेणार शस्त्र,’ ब्रम्हास्त्र’ चित्रपटातील अमिताभ बच्चन यांचा फस्ट लूक आला समोर

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि रणबीर कपूर (Ranbir Kapoor)  यांच्या ‘ब्रम्हास्त्र’ चित्रपटाची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. नुकताच या चित्रपटाचा छोटासा टिझर समोर आला होता. ज्यामध्ये चित्रपटाच्या स्टारकास्टचा जलवा पाहायला मिळाला होता. १५ जूनला या चित्रपटाचा ट्रेलर रिलीझ होणार आहे, त्याआधी चित्रपटात महत्वाच्या भूमिकेत असलेले अभिनेते अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांचा चित्रपटातील फस्ट लूक समोर आला आहे. हातात शस्त्र आणि डोळ्यात दिसणारा राग यामुळे हा लूक खूपच जबरदस्त दिसत आहे. त्याचबरोबर चित्रपटातील अमिताभ बच्चन यांच्या भूमिकेचाही खुलासा करण्यात आला आहे. 

या चित्रपटात अमिताभ बच्चन यांचा अ‍ॅक्शन दिसणार आहे, हे हा लूक पाहिल्यानंतर स्पष्ट झाले आहे. बिग बींच्या चेहऱ्यावर काही दुखापतीच्या खुणाही दिसत आहेत. अमिताभ बच्चन यांचा हा लूक त्यांच्या चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहे. करण जोहरने ब्रह्मास्त्रमधील अमिताभ बच्चन यांचा हा लूक सोशल मीडियावर शेअर करत ‘गंगा ही ज्ञानाची गुरु आहे. गुरू जेव्हा शस्त्र उचलतात तेव्हा पापाचा नाश होतो. असा कॅप्शन दिला आहे. या पोस्टवरुन अमिताभ बच्चन म्हणजेच ‘गुरू’ या चित्रपटात पाप नष्ट करण्यासाठी शस्त्र उचलताना दिसणार आहेत.

धर्मा प्रोडक्शनच्या बॅनरखाली तयार होत असलेल्या ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटाचे दिग्दर्शन अयान मुखर्जी करत आहे. अमिताभ बच्चन यांच्यासह रणबीर कपूर, आलिया भट्ट, मौनी रॉय, नागार्जुन अक्किने, डिंपल कपाडिया या चित्रपटात दिसणार आहेत. शाहरुख खान देखील छोट्या भूमिकेत दिसणार आहेत. त्याची एक छोटीशी झलक देखील या चित्रपटात पाहायला मिळाली होती.  चित्रपटातील आलिया आणि रणबीरचा लूक आधीच समोर आला आहे. चित्रपटात मौनी रॉय नकारात्मक भूमिका साकारत आहे. 300 कोटींच्या तगड्या बजेटचा हा चित्रपट बनायला खूप वेळ लागला. पण आता अखेर तो रिलीज होणार आहे. चित्रपटात तुम्हाला भरपूर VFX पाहायला मिळतील. 15 जूनला ट्रेलर रिलीज झाल्यानंतर ब्रह्मास्त्र 9 सप्टेंबरला थिएटरमध्ये दाखल होणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हे देखील वाचा