Thursday, June 1, 2023

ट्रेंड फॉलो करताना विद्या बालनची झाली मोठी फजिती, सोशल मीडियावर मजेशीर व्हिडिओ होतोय व्हायरल

बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालन (Vidya Balan) आपल्या बिंधास्त आणि मजेशीर स्वभावामुळे नेहमीच सर्वांचे लक्ष वेधून घेत असते. सोशल मीडियावरील पोस्ट असो किंवा कार्यक्रमांमधील दिलखुलास गप्पा असो आपल्या बिंधास्त वक्तव्यामुळे आणि गमतीशीर स्वभावाने ती नेहमीच प्रेक्षकांचे मनोरंजन करत असते. सध्या तिचा असाच एक गमतीशीर व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे ज्यामध्ये शिल्पाचा डान्स पाहून चाहत्यांची हसुन हसुन पुरेवाट लागली आहे. कोणता आहे तो  व्हिडिओ चला जाणून घेऊ. 

सध्या सोशल मीडियावर दररोज नवनवीन ट्रेंड पाहायला मिळत असतात. कधी गाणी,तर कधी वेगळी डान्स स्टाईलमुळे असे व्हिडिओ चांगलेच व्हायरल होत असतात. ज्यावर रिल बनवण्याचा मोह फक्त नेटकऱ्यांनाच नव्हेतर मोठमोठ्या बॉलिवूड कलाकारांनाही आवरत नाही. असाच एक ट्रेंड सध्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आला आहे. ज्यावर डान्स करतानाचा अभिनेत्री विद्या बालनचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडिओमध्ये विद्या बालनची चांगलीच फजिती झालेली दिसत आहे.

हा व्हिडिओ विद्या बालनने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरुन शेअर केला आहे. ज्यामध्ये ती ब्लॅक क्रॉप टॉप आणि चेक्स शर्ट घातलेली दिसत आहे. यामध्ये विद्या बियोंसे  गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. गाणे सुरू होताच ती खाली बसायला जाते आणि पाठीमागून हाडे मोडल्याचा आवाज येतो. यानंतर महिलेच्या किंचाळण्याचा आवाज या व्हिडिओमध्ये येताना दिसत आहे. व्हिडिओच्या शेवटी विद्या बालनच्या एक्सप्रेशन्स पाहून चाहत्यांची हसुन पुरेवाट लागली आहे. या व्हिडिओसोबत विद्या बालनने प्रत्येक ट्रेंड आपल्यासाठी नसतो असा कॅप्शनही दिला आहे.

दरम्यान बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून विद्या बालनचे नाव घेतले जाते. आपल्या दमदार अभिनयाने आणि सौंंदर्याने तिने सिने जगतात आपली विशेष ओळख निर्माण केली आहे. ‘द डर्टी पिक्चर’, ‘जलसा’, ‘कहाणी’, ‘भुलभूलैय्या’ अशा अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये तिने काम केले आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हे देखील वाचा