Friday, July 5, 2024

या वयातही अमिताभ बच्चन बनले ‘म्युजिक कंपोजर’!, ‘या’ चित्रपटामध्ये मिळाले काम

बॉलिवूडचे बिग बी अमिताभ बच्चन (amitabh bachchan) यांना आपल्या करिअरमध्ये बॉलिवूड गाजवणारी चित्रपट दिले आहेत. त्यांना आजही बॉलिवूडचा शेहनशाह म्हणून ओळखले जाते. त्यांनी इंडस्ट्रीमध्ये खूप यशाच्या पायऱ्या चढल्या आहेत. एका अभिनेत्यासोबतच ते सिंगर आणि चित्रपट निर्माताही आहेत अमिताभ बच्चन यांना वयाचे 54 वर्ष होउनही त्यांच्यामध्ये काही तरी नवीन करण्याचा जोश आजही आहे, अमिताभ बच्चन यांना काहीतरी नवीन करुन दाखवण्याचे सुचले आहे. जाणुन घेउया पूर्ण माहिती

अमिताभ बच्चन यांची नविन भुमिका

बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये अमिताभ बच्चन यांना 54 वर्ष झाले आहेत. त्यांनी आपल्या अभिनयाने यशाचे शिखर पार केले आहे. त्यांनी फक्त एक अभिनेताच नाही तर सिंगर आणि चित्रपट निर्माता म्हणूनही काम केले आहे. आजही ते टेलिव्हिजनवर ‘कौन बनेगा करोडपती’ या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करत आहेत. या वयातही अमिताभ काहतरी नवीन करुन दाखवण्याच्या प्रयत्नात असतात. त्यांच्या या प्रयत्नाला यश आले आहे आणि त्यांना नवीन काम मिळाले आहे, ते अपकमिंग चित्रपट ‘चुप’ मध्ये सिंगितकार बनले आहेत.

अमिताभ बच्चन हे नाव पहिल्यांदाच संगितकाराच्या रुपात फिल्म क्रेडूृीट यादीत झळकणार आहे. ‘चुप: रिवेंज ऑफ आर्टिस्ट’ या चित्रपटाचे दिग्दर्शन आर बाल्की यांनी केले आहे.  त्यांनी अमिताभ बच्चन यांना ‘पा’, ‘चीनी कम’, आणि ‘शमिताभ’ सारख्या चित्रपटामध्ये कास्ट केले होते. ‘चुप’ या चित्रपटामध्ये दुलाकर सलमान, सनी देओल, श्रेया धनवंतरी आणि पुजा भट्ट हे कलाकार पाहायला मिळणार आहे.

अमिताभ यांची पियानो धुन एकल्यावर आर बाल्की काय बोलले.?

या चित्रपटाचे निर्देशन दिवंगत गुरु दत्त यांना श्रद्धांजली वाहत असल्याच्या रुपात बघता येणार आहे. अमिताभ बच्चन या चित्रपटात कसे जोडले गेेले आहेत ते चित्रपट निर्माता आर बाल्की यांनी एका मुलाखतीदरम्यान सांगितले आहे.”सगळं फारच अचानक झाले आहे. “मी अमिताभ यांना चित्रपट (‘चुप’) दाखवण्यासाठी गेलो होतो, मग त्यांनी मला त्यांच्या जवळ बोलवले आणि पियानोवर एक धुन वाजवून दाखवली आणि बोलले की तुझा चित्रपट आणि त्यातील पात्र पाहुन मला या धुन सारखे जाणवलं.”

अमिताभ यांनी उपहारमध्ये दिले अपले संगित 

चित्रपट निर्माताने सांगितले, ती धुन माझ्या मनाला लागली. मी उत्साहित होतो. मी त्यांना विचारले की या धुनला मी माझ्या चित्रपटामध्ये वापरु शकतो का.? एक सेकंदाचाही विचार न करता अमिताभ यांनी आपली धुन चित्रपटासाठी उपहार म्हणुन दिली.  अमिताभ यांच्या करिअरमधील ‘चुप’ हा पहिला चित्रपट आहे ज्यामध्ये ते ‘कंपोजिशन’ म्हणुन काम करणार आहेत.

23 सप्टेंबरला प्रदर्शित होणार चुप चित्रपट

‘चुप’ चित्रपट हा ‘साइकलॉजिकल थ्रिलर’ आहे जो 23 सप्टेंबरला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचा टिझर जूनमध्ये रिलिज झाला होता. चित्रपटाविषयी सांगत असताना आर बाल्की यांनी एका वक्तव्यात सांगितले की, शांत संवेदनशिल कलाकाराला एक श्रद्धांजली आहे आणि त्या सुचिमध्ये गरुदत्त सगळ्यात पहिल्या स्थानी आहेत. माझ्याकडे बऱ्याच दिवसापासून हि गोष्ट होती माल आनंद आहे की, शेवटी मी या गेष्टीचे चित्रपटात रुपांतर केले आहे आणि या चित्रपटाचे शुटिंगही पुर्ण होत आहे.

हेही वाचा
सोनू सुदने कुटुंबासोबत बाप्पाला दिला शेवटचा निरोप, विसर्जन ठिकानी जमली चाहत्यांची गर्दी
तीन वर्षे जुन्या प्रकरणात कमाल आर खानला अटक, अभिनेत्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी
विधू विनोद चोप्रा यांनी केलीये ब्लॉकबस्टर चित्रपटांची निर्मिती, एका सिनेमाने कमवलेत तब्बल ८५४ कोटी

हे देखील वाचा