Thursday, July 18, 2024

सोनू सुदने कुटुंबासोबत बाप्पाला दिला शेवटचा निरोप, विसर्जन ठिकानी जमली चाहत्यांची गर्दी

सोनू सुद याने साउथ इंडस्ट्री सोतच बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये देखिल आपली छाप सोडली आहे. सहसा त्याने चित्रपटात नकारात्मक भुमिक केल्या असतील पण दैनंदिन जिवनात त्याने देवमानसाची भुमिका बजावली आहे. या अभिनेत्याच्याही घरी पाच दिवसाच्या बप्पाचे आगमन झाले होते (4 सप्टेंबर) दिवशी त्याने आपल्या कुटुंबासोबत गणती बप्पाला अलविदा केले आहे.

सगळीकडे सध्या गणपती बप्पाच्या जल्लोष सुरु आहे. कोरोणामुळे 2 वर्ष लोकांना गणपती उत्सव साजरा करता आला नाही. त्यामुळे यावर्षी बप्पाचा जल्लोष खूपच जोरदार चालू आहे. यामध्ये खूप सारे सेलिब्रिटीनी आपल्या घरीे बाप्पाचे आगमन केले होते, कोणाचा गणपती दिड दिवसाचा असतो तर कोणाचा पाच दिवसाचा असतो. अशातच सोनू सुद याने आपल्या कुटुंबासोबत पाच दिवसाच्या गणपती बप्पाचे पुर्ण विधी विधानासोबत विसर्जन केले आहे.

सोनू सुद (Sonu Sood ) याने गणेश चतुर्थी दिवशी आपल्या घरी पाच दिवसाच्या बाप्पाची स्थापना केली होती. पाच दिवसाच्या सेवानंतर त्याने पुर्ण रिती रिवाजानुसार बप्पाचे विसर्जन केले. त्याने आपल्या कुटुंबासोबत म्हणजेच पत्नी आणि  मुलासोबत आधी आरती केली आणि मग त्याच्या मुलासोबत गणपती बप्पाचे विसर्जन केले.

कोरोनाकाळात लॉकडाउनमध्ये सोनू सुदने लोकांची खूपच मदत कोली होती, तेव्हापासून लोक त्याला देवमाणूस समजतात. त्याने सिद्ध करुन दाखवले की, तो फक्त पडद्यावरच नाही तर वैयक्तीक आयुष्यातही हिरो आहे. तो अजूनही वेगवेगळ्या गावातील, शहरातील, राज्यातील लोकांना मदत करत आहे. तो लोकांसाठी एक मसिहा बनला आहे त्याला खूप लोकांचे प्रेम मिळत आहे. त्याने चाहत्यांच्या मनात घर केले आहे, त्यामुळे विसर्जन करत असताना चाहत्यांचा खूपच गर्दी झाली होती.

सोनू सुदच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर काही दिवसापूर्वी  प्रदर्शित झालेला ‘पृथ्वीराज’ चित्रपटामध्ये  ‘चंदबरदाइ’ या भुमिकेत दिसला होता. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला मात्र, सेनू सुदला त्याच्या भुमिकेसाठी चांगला प्रतिसाद मिळाला होता. तो भले चित्रपटामध्ये खलनायकाच्या भुमिका करत असेल पण त्याच्या वैयक्तीक आयुष्यात तो लोकांचा हिरो बनला आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा
पल्लवी जोशीने सांगितले बॉलिवूड चित्रपटांच्या अपयशाचे कारण, बॉयकॉटवर दिले हे मत
विधू विनोद चोप्रा यांनी केलीये ब्लॉकबस्टर चित्रपटांची निर्मिती, एका सिनेमाने कमवलेत तब्बल ८५४ कोटी
आयुष्यातील खऱ्या शिक्षकाची कहाणी दाखवणारे हे बॉलिवूड सिनेमे एकदा पाहाच

 

हे देखील वाचा