Wednesday, July 3, 2024

अमिताभ बच्चन यांच्या नातींबद्दल नव्या नवेलीबद्दल ‘या’ गोष्टी तुम्हाला माहित आहेत का?

महानायक अमिताभ बच्चन आणि त्यांचे संपूर्ण कुटुंब कोणाला माहित नाही असा व्यक्ती शोधूनही सापडणार नाही. सोशल मीडियामुळे त्यांच्या घरातील चित्रपटांमध्ये काम न करणाऱ्या व्यक्ती देखील सेलिब्रिटीज बनल्या आहेत. अमिताभ बच्चन यांच्या इतकेच फेम, प्रसिद्धी आणि लोकप्रियता त्यांना मिळते. याच कुटुंबातील महत्वाची व्यक्ती म्हणजे बिग बी यांची नात नव्या नवेली. अमिताभ बच्चन यांच्या मुलीची श्वेताची मुलगी असणारी नव्या कोणत्याही चित्रपटातून झळकलेली नाही. तरीही तिची लोकप्रियता मोठमोठ्या अभिनेत्रींइतकीच आहे. सोशल मीडियावर लाखो फॉलोवर्स असणारी नव्या स्टार कीड म्हणूनच ओळखली जाते. चित्रपटांमध्ये येण्याचा सध्या तरी तिचा कोणताच मानस नाहीये. ती अभिनयात नसली तरी ती तिच्या विविध कामांनी ओळखली जाते. फॅशन, स्टाईलमध्ये ती नेहमीच बॉलिवूड अभिनेत्रींपेक्षा एक पाऊल पुढे असते. आज या लेखातून आपण नव्या नवेलीबद्दलच्या पाच अशा गोष्टी जाणून घेऊया ज्या कोणालाच माहित नाही.

नवणारे नेहमीच स्वतःला बॉलिवूडपासून लांब ठेवले. अमिताभ बच्चन यांची नात असणाऱ्या नव्याने फोर्डहॅम विद्यापीठातून डिजिटल टेक्नोलॉजीमध्ये पदवी संपादन केली आहे. तिला फेसबुक आणि एक्सआरसी लॅब प्रोडक्ट्च्या मार्केटिंग आणि स्ट्रेटरजी ग्रोथचा अनुभव आहे.

नव्याने सामाजिक कार्यात तिची सुरुवात करत आरा हेल्थची स्थापना केली आहे. हा की महिलांच्या आरोग्याचा मंच असून ज्याचा उद्देश क्षत्रियांच्या आरोग्याबाबत जागरूकता आणि सेवा निर्माण करणे असा आहे. ती नवेली प्रोजेक्टची देखील संस्थापक आहे. यातून शिक्षण, आर्थिक स्वातंत्र्य, घरगुती हिंसा, शारीरिक आणि मानसिक आरोग्य या म्हतवाचं ४ क्षेत्रांवर काम करते.

नव्या त्यावेळी अधिक चर्चेत आली, जेव्हा उत्तराखंडचे मुख्यमंत्री असणाऱ्या तीरथ सिंह रावत यांनी मार्च २०२१मध्ये रिप्ड जीन्स घालणाऱ्या महिलांवर त्यांचे विचार व्यक्त करत म्हटले होते की, त्या महिला घरी मुलांसाठी चांगले वातावरण तयार नाही करत. याविरोधात नव्याने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत लिहिले होते की, “आमचे कपडे बदलण्याआधी तुमची मानसिकता बदल. मी माझी रिप्ड जीन्स नक्कीच घालणार, आणि गर्वाने घालणार धन्यवाद.”

नव्या तिच्या आजोबांची अमिताभ बच्चन यांच्यासाठी रॅप संगीताची प्लेलिस्ट देखील बनवते. तिला रॅप संगीत खूप आवडते. एका मुलाखतीमध्ये तिने सांगितले होते की, तिला तिच्या वडिलांच्या व्यवसायात काम करायचे असून, ती त्यासाठी तयार आहे. मी नेतृत्व करणारी चौथी पिढी असेल तर पहिली महिला असेल. माझ्या पंजोबांनी दिलेली ही पारंपरिक देण मला पुढे नेताना खूप गर्व होईल.” नव्या चित्रपटांमध्ये दिसत नसली तरी ती बॉलिवूडच्या अनेक कार्यक्रमांमध्ये आणि पार्ट्यांमध्ये कुटुंबासोबत किंवा एकटी दिसत असते.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘या’ अभिनेत्याच्या वडिलांनी संपवले होते स्वत:चेच कुटुंब, पत्नी अन् मुलीला गोळी मारून केली आत्महत्या

-घटस्फोटानंतर पुरुषांपेक्षा जास्त त्रास महिलांना होतो, म्हणत ‘या’ कलाकारांनी व्यक्त केले दुःख

-भर इव्हेंटमध्ये उघडली सोनम कपूरच्या शर्टची बटणं, कॅमेऱ्यात कैद झाला अभिनेत्रीचा ‘Oops Moment’

हे देखील वाचा