Sunday, April 14, 2024

स्ट्रगलर असणाऱ्या अमिताभ बच्चन यांच्या प्रेमात वेड्या झाल्या होत्या जया भादुरी, अशी होती प्रेमकहाणी

बॉलिवूडमध्ये अमिताभ बच्चन आणि जया बच्चन हे नेहमीच एक पॉवरकपल म्हणून ओळखले जातात. मागील 50 वर्षांपासून हे दोघं त्यांचे सुखी वैवाहिक आयुष्य जगत इतर जोड्यांसाठी एक आदर्श ठरताना दिसत आहे. लग्नानंतर जया आणि अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या वैवाहिक आयुष्यात अनेक चढ उतार पाहिले. नवरा बायकोच्या नात्यात असणाऱ्या विश्वास, समजुदारपणा, सन्मान, प्रेम आदी अनेक गोष्टींचा एक नवीन मापदंड त्यांनी जगासमोर मांडला. आज आम्ही तुम्हाला या दोघांच्या प्रेमकहाणी बद्दल सांगणार आहोत.

साल होते 1970 चे तेव्हा अमिताभ बच्चन निर्माता के. अब्बास आणि इतर काही अभिनेत्यांसोबत पुण्याच्या फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये पोहचले होते. तेव्हा पहिल्यांदा जया यांनी अमिताभ यांना पाहिले. तेव्हा अमिताभ यांच्या व्यक्तिमत्वाने जया यांचे लक्ष वेधून घेतले आणि त्यांना अमिताभ यांच्यामध्ये काहीतरी वेगळे जाणवले. जेव्हा अमिताभ यांना जया यांनी पाहिले तेव्हा त्या आधीपासूनच सुपरस्टार होत्या तर अमिताभ चित्रपटांमध्ये यश मिळवण्यासाठी धडपड करत होते. अमिताभ बच्चन यांना त्यांच्या बारीक होण्यावरून अनेक टोमण्यांचा सामना करावा लागला. पुण्याच्या फिल्म इन्स्टिटयूटमध्ये तर त्यांना छडी म्हटले जायचे. तेव्हा जया खूपच चिडायच्या. यावरून जया त्यांच्या मैत्रिणीशी देखील भांडायच्या. अमिताभ बच्चन यांनी जया यांना पहिल्यांदा एका मासिकाच्या कव्हर पेजवर पाहिले आणि त्यांना वाटले की, त्यांची ड्रिमगर्ल त्यांना मिळाली.

काही काळाने अमिताभ आणि जया यांच्या भेटी वाढू लागल्या आणि त्यांची मैत्री झाली. या दरम्यानचा अमिताभ यांचा जंजीर सिनेमा सुपरडुपर हिट झाला. या सिनेमाचे यश साजरे करण्यासाठी अमिताभ आणि जया यांना भारतातून बाहेर लंडनला जायचे होते. यासाठी ते खूप तयारी करत होते मात्र अमिताभ यांच्या वडिलांनी स्पष्ट केले की, परदेशात जायचे असेल तर आधी लग्न करा आणि मग जा. अमिताभ यांनी वडिलांच्या आज्ञेचे पालन केले आणि १९७३ साली जया यांच्याशी लग्न केले.

लग्नानंतर अमिताभ आणि रेखा यांच्या लव्हस्टोरीने तुफान लाइमलाइट मिळवले. दोघांमध्ये अफेयर असल्याच्या बातम्या रोजच येऊ लागल्या. अमिताभ आणि रेखा यांनी एकमेकांना डेट करण्यास सुरुवात देखील केली. पडद्यावर हिट असलेली ही जोडी पडद्यामागे देखील गाजत होती. जेव्हा जया यांना याबद्दल समजले तेव्हा त्यांना मोठा धक्का बसला. मीडिया रिपोर्ट्सप्रमाणे जया यांनी रेखा यांना जेवायला घरी बोलवले. जेवण झाल्यानंतर जया यांनी रेखा यांना सांगितले की, “आता काहीही झाले तर मी अमितला सोडणार नाही.” त्यानंतर रेखा यांना जाणवले की त्यांच्या नात्याचे भविष्य काहीच नाही आणि त्यांनी पुढे ब्रेकअप केले.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही नक्की वाचा-

लव्ह, रिलेशनशीप आणि आत्महत्या…? जिया खानच्या मृत्यूचं आजवर न सुटलेलं कोडं!

वयाच्या १५ व्या वर्षीच ‘आर्ची’ बनली होती स्टार; बारावीचे पेपर द्यायला बॉडीगार्डलाही न्यावे लागायचे सोबत

हे देखील वाचा