Monday, February 24, 2025
Home बॉलीवूड जेव्हा बिग बींनी नाईलाजाने बांधली होती शर्टाची गाठ; फॅशन समजून चाहत्यांनीही केली नक्कल, आता सांगितला किस्सा

जेव्हा बिग बींनी नाईलाजाने बांधली होती शर्टाची गाठ; फॅशन समजून चाहत्यांनीही केली नक्कल, आता सांगितला किस्सा

बॉलिवूडमधील ‘महानायक’ म्हणजे अमिताभ बच्चन होय. ते सोशल मीडियावर सर्वात जास्त सक्रिय असणाऱ्या कलाकारांपैकी एक आहेत. ते सोशल मीडियावर नेहमीच त्यांच्या चित्रपटांसंबंधित किस्से शेअर करत असतात. असेच आता पुन्हा एका अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या एका जुन्या चित्रपटातील एक किस्सा चाहत्यांसोबत शेअर केला आहे. त्यात त्यांनी सांगितले आहे की, कसे नाईलाजाने त्यांना शर्टची गाठ मारावी लागली होती. पण प्रेक्षकांनी त्याला स्टाईल म्हटले होते. त्यानंतर प्रेक्षकांनी या लूकला खूप पसंती दर्शवली होती. (Amitabh Bachchan share a behind story of knotted shirt of deewar movie)

‘बिग बी’ यांनी इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर करून पोस्ट लिहिली आहे. यात त्यांनी त्यांच्या लूकमागील संपूर्ण कहाणी सांगितली आहे. या फोटोमध्ये ते ब्ल्यू शर्ट आणि लाईट ब्ल्यू कलरच्या पँटमध्ये दिसत आहे. हा शर्ट त्यांनी कमरेवर बांधला होता. त्यावेळी त्यांचा हा लूक प्रेक्षकांना खूप आवडला होता. त्यांनी हा लूक कॉपी देखील केला होता. त्यांचा हा लूक ‘दीवार’ या चित्रपटातील आहे. या मागील कहाणी सांगून त्यांनी सर्वांना हैराण केले आहे.

या लूकच्या मागील कहाणी सांगत बिग बी यांनी लिहिले की, “ते पण दिवस होते मित्रा आणि तो नोटेड शर्ट. पण यामागे एक कहाणी आहे. शूटचा पहिला दिवस होता. शॉट देखील तयार होता. कॅमेरादेखील रोल झाला होता, तेव्हा समजले की, हा शर्ट खूपच मोठा आहे. गुडघ्यापेक्षाही लांब होता. त्यावेळी दिग्दर्शक लगेच दुसरा शर्ट नव्हते बदलू शकत त्यामुळे मी लगेच त्या शर्टची गाठ मारली.”

अमिताभ बच्चन यांच्या एका चाहत्याने या फोटोवर कमेंट केली आहे की, “कोणी कोणी त्यांची ही स्टाईल कॉपी केली आहे.” कॉमेडियन सुनील ग्रोवर याने देखील त्यांच्या या फोटोवर कमेंट करून सांगितले की, त्याने देखील त्यांचा हा लूक कॉपी केला आहे.

अमिताभ बच्चन या दिवसात ‘कौन बनेगा करोडपती 13’ ची शूटिंग करण्यात व्यस्त आहेत. या शोची रजिस्ट्रेशन प्रक्रिया आता संपली आहे. अमिताभ बच्चन हे बॉलिवूड मधील एक ज्येष्ठ आणि यशस्वी अभिनेते आहे. त्यांनी त्यांच्या करिअरमध्ये अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. यात ‘शोले’, ‘मर्द’, ‘कभी खुशी कभी गम’, ‘सूर्यवंशम’, ‘पा’, ‘दीवार’, ‘मोहोबत्तें’, ‘बागबान’ या चित्रपटात काम केले आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हे देखील वाचा