बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या अभिनयाने लाखो प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. त्यांनी सत्तरच्या दशकापासून रसिक प्रेक्षकांच्या मनोरंजनाची अविरतपणे सेवा केली आहे. ‘बिग बीं’चा अभिनयातील अनुभव फार दांडगा आहे. त्यांच्या दमदार अभिनयासह त्यांचा स्वभाव देखील प्रेमळ असल्याने ते अजूनही प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहेत.
आपल्या चाहत्यांसाठी बिग बी सोशल मीडियावर कायम सक्रिय असतात. आपल्या चाहत्यांचे मनोरंजन करण्याची ते एकही संधी सोडत नाहीत. सोशल मीडियाच्या माध्यमातून सतत आपल्या आयुष्यात घडणाऱ्या गोष्टींची माहिती चाहत्यांना देत असतात. अशात त्यांनी आता पुन्हा एकदा त्यांच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो पोस्ट केला आहे. त्यांच्या या फोटोला चाहत्यांनी खूप पसंती दाखवली आहे. त्यांनी शेअर केलेल्या या फोटोमध्ये ते क्रिकेट खेळताना दिसत आहेत. हा फोटो ब्लॅक एँड व्हाईट आहे. त्यामुळे चाहत्यांना त्यांच्या जुन्या चित्रपटांची आठवण येत आहे. या फोटोमध्ये त्यांच्या चेहऱ्यावर हसू दिसत आहे.
बिग बींनी हा फोटो शेअर करत कमेंटमध्ये लिहिले आहे की, “लोकेशनवर क्रिकेट खेळताना, शॉटची तयारी सुरू आहे. काश्मीरमध्ये मिस्टर नटवरलालचे शूट. मला वाटत आहे, बॅट जरा छोटीच पडली.”
चाहत्यांनी त्यांच्या या फोटोवर अनेक हार्ट आणि फायर ईमोजी कमेंट केले आहेत. या फोटोला आतापर्यंत ७ लाखांपेक्षाही अधिक लाईक्स मिळाले आहेत. तसेच अनेकांना बिग बींच्या चेहऱ्यावरील हसू पाहून त्यांना देखील हसू येत आहे. म्हणून चाहत्यांनी हसायचे इमोजी देखील कमेंटमध्ये पोस्ट केले आहेत. बिग बींची उंची जास्त आहे, त्यामुळे त्यांच्या तुलनेत फोटोमधील बॅट लहान दिसत आहे. ते अजूनही ८० ते ९० च्या दशकांतील चित्रपटांप्रमाणेच सक्रिय आहेत. सध्या अमिताभ बच्चन ‘कौन बनेगा करोडपती’ या शोचे सूत्रसंचालन करत आहेत.
दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-शाहरुख खानच्या लाडक्या लेकीने शेअर केला फोटो; मिरर सेल्फीतून दाखवला तिचा कमनीय आकर्षक बांधा
-‘…आणि आम्ही हो म्हणालो,’ अभिजित आणि सुखदा खांडकेकर यांनी चाहत्यांना दिली ‘ही’ गोड बातमी
-हिना खानचं ‘मैं भी बर्बाद’ गाणं रिलीझ; अभिनेत्रीने अंगद बेदीसोबत दिले बोल्ड सीन