Saturday, April 20, 2024

हिना खानचं ‘मैं भी बर्बाद’ गाणं रिलीझ; अभिनेत्रीने अंगद बेदीसोबत दिले बोल्ड सीन

बॉलिवूडने अनेक कलाकारांना आपल्यामध्ये सामावून घेतले आहे. अनेक कलाकारांनी आपले स्थान निर्माण केले आहे. आपल्या अभिनयाने आणि अदाकारीने चाहत्यांचे नेहमी मनोरंजन केले आहे. अशीच एक अभिनेत्री आहे, जिने आपल्या सौंदर्याने आणि अदाकारीने चाहत्यांना वेड लावले आहे. ती म्हणजे अभिनेत्री हिना खान.

हिना खान मनोरंजन क्षेत्रातील एक मोठे नाव बनली आहे. हिना तिच्या करिअरमध्ये अनेक नवीन गोष्टी एक्सप्लोर करत आहे. हिनाने छोट्या पडद्यानंतर चित्रपटांमध्येही आपली छाप सोडली आहे. त्यानंतर आता हिना अनेक म्युझिक व्हिडिओंमध्येही दिसू लागली आहे. अभिनेता अंगद बेदीसोबत हिना खान ‘मैं भी बर्बाद’ या नवीन गाण्याच्या व्हिडिओमध्ये दिसली आहे.

हिना खानचे ‘मैं भी बर्बाद’ हे गाणे गुरुवारी (२३ सप्टेंबर) प्रदर्शित झाले आहे. प्रदर्शित होण्यापूर्वीच हिनाचे हे गाणे गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत होते. खरं तर, निर्मात्यांनी काही दिवसांपूर्वीच या गाण्यात हिना खानचा फर्स्ट लूक शेअर केला होता. ज्यामध्ये हिना खानच्या बोल्डनेसमुळे बरीच चर्चा रंगली होती.

गाण्यात बोल्ड सीन केल्यावर हिना म्हणाली
माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत हिनाने तिच्या बोल्ड लूक आणि गाण्यातील दृश्यांविषयी आपली प्रतिक्रिया दिली आहे. हिना म्हणाली की, “‘मैं भी बर्बाद’ हा एक वेगळा आणि अनोखा प्रकल्प आहे. माझ्या चाहत्यांनी मला वेगवेगळ्या भूमिका करताना पाहिले आहे आणि ते देखील पूर्णपणे वेगळे होते. मला वाटते की, अभिनेत्री म्हणून उत्कृष्ट भूमिका पार पाडणे हे माझे कर्तव्य आहे. जर स्क्रिप्टमध्ये बोल्ड अभिनेत्रीची भूमिका साकारायची असेल, तर मी त्याच पद्धतीने अभिनय करेल.”

हिना खानच गाणं प्रदर्शित
अभिनेत्री हिना खान आणि अंगद बेदी पहिल्यांदाच ‘मैं भी बर्बाद’ गाण्यातून पडद्यावर एकत्र दिसले आहेत. या गाण्यात दोघांमधील जबरदस्त केमिस्ट्री पाहायला मिळाली आहे.

या गाण्याला आतापर्यंत १ लाखांपेक्षाही अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘अनुपमा’ मालिकेतील सुनेने चक्क आपल्या सासऱ्यासोबत केला रोमान्स, व्हिडिओ झाला व्हायरल

-फॅन्सला पुन्हा झाला बिग बॉस फेम सोनाली फोगट यांच्या जबरदस्त डान्सचा ‘दिदार’

-‘बालिका वधू’ फेम अविकाचा दिसला बिकिनी अवतार, फोटो आणि व्हिडिओ झाले व्हायरल

हे देखील वाचा