Friday, June 13, 2025
Home बॉलीवूड जया बच्चनसोबत रोमँटिक फोटो शेअर करत अमिताभ बच्चन यांनी दिल्या करवा चौथच्या शुभेच्छा

जया बच्चनसोबत रोमँटिक फोटो शेअर करत अमिताभ बच्चन यांनी दिल्या करवा चौथच्या शुभेच्छा

आज २४ ऑक्टोबर रोजी संपूर्ण देशात करवा चौथ हा सण मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने साजरा होत आहे. आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि अखंड सौभाग्य टिकण्यासाठी स्त्रिया हे व्रत करतात. बहुतकरून उत्तर भारतातील स्त्रिया हा सण साजरा करतात. मात्र चित्रपटांमध्ये हा सण मोठ्या प्रमाणावर दाखवला जात असल्यामुळे आणि काळ बदलल्यामुळे हा सण संपूर्ण देशातील स्त्रिया साजरा करतात. चित्रपटांमुळे या सणाला एक वेगळेच वलय प्राप्त झाले आहे. बॉलिवूड अभिनेत्री देखील हे व्रत साजरे करताना दिसतात.

करवा चौथच्या हा सण मनोरंजन विश्वातील अभिनेत्री देखील मोठ्या उत्साहाने साजरा करतात. अनेक कलाकार सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्वांना शुभेच्छा देत आहे. बॉलिवूडचे महानायक असणाऱ्या अमिताभ बच्चन यांनी देखील त्यांच्या आणि जया बच्चन यांचा एक फोटो शेअर करत करवा चौथच्या शुभेच्छा दिल्या आहेत. या फोटोमध्ये अमिताभ जया यांना मिठी मारताना दिसत आहे. या फोटोसोबत त्यांनी लिहिले की, “करवा चौथच्या अनेक अनेक शुभेच्छा. सर्व काही कुशल मंगल होवो.”

अमिताभ बच्चन यांनी शेअर केलेला फोटो का करण जोहरच्या ‘कभी ख़ुशी कभी गम’ सिनेमातील असून, या फोटोला त्यांनी फिल्टरचा वापर करत स्केचमध्ये बदलवले आहेत. अमिताभ बच्चन सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. ते त्यांचे सोशल मीडिया स्वतःच अपडेट करतात.

अमिताभ बच्चन यांच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाल्यास काही दिवसांपूर्वीच रुमी जाफरी दिग्दर्शित त्यांचा ‘चेहरे’ हा सिनेमा प्रदर्शित झाला आहे. लवकरच ते अयान मुखर्जीच्या ‘ब्रह्मास्त्र’मध्ये दिसणार आहे. या सिनेमात त्यांच्यासोबत रणबीर कपूर आणि आलिया भट्ट मुख्य भूमिकेत आहे. याशिवाय सध्या बिग बी टेलिव्हिजनवरच्या सुपरहिट ‘कौन बनेगा करोडपती’ शोचे सूत्रसंचालन करताना दिसत असून, हा शो तुफान लोकप्रिय झाला आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

राज कुंद्रा अन् शिल्पा शेट्टीचा सुरूये वाद? पतीशिवाय अभिनेत्री गेली कौटुंबिक ट्रिपला

गुलाबी साडीत कमाल दिसतेय रिंकू, अभिनेत्रीच्या पारंपारिक लूकने वाढवले चाहत्यांच्या हृदयाचे ठोके

सेटवरील गोळीबारात झालेल्या मृत्यूमुळे प्रियांका झालीय दुःखी, आपल्या भावना शेअर करत म्हणाली…

हे देखील वाचा