…नाहीतर आज ‘बच्चन’ ऐवजी ‘अमिताभ श्रीवास्तव’ नावाने बीग बींना मिळाली असती ओळख


अमिताभ बच्चन बस नाम ही काफी हैं! बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन हे नेहमी सोशल मीडियाच्या माध्यमातून फॅन्ससोबत जोडलेले असतात. ते नेहमी त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून त्यांचे विविध फोटो, व्हिडिओ, त्याच्याशी संबंधित अनेक अपडेट ते देत असतात. बिग बी न चुकता रोज त्यांचा ब्लॉग देखील लिहतात. एकदा त्यांनी त्यांच्या एका कार्यक्रमात सांगितले होते की, रात्री किती उशीर झाला तरी ते ब्लॉग लोहूनच झोपतात. ही सवयच त्यांनी स्वतःला लावून घेतली आहे.

बिग बी यांनी नुकताच एक ब्लॉग लिहला आहे. त्यांचा हा ब्लॉग चर्चेत येण्याचे मुख्य कारण म्हणजे, त्यांनी हा ब्लॉग त्यांच्या आई, बाबांच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त लिहिला आहे. त्यांनी त्यांच्या ब्लॉगमध्ये लिहिले आहे की, ‘माझ्या आई, वडिलांच्या या नात्याने समाजाच्या सर्व रूढी आणि परंपरा तोडण्याचे काम केले होते. आता रात्रीच्या १२ वाजता २३ जानेवारीचा दिवस संपून २४ जानेवारीचा दिवस सुरु झाला आहे. आज आई, बाबांच्या लग्नाचा वाढदिवस…२४ जानेवारी १९४२ साली झालेल्या या लग्नाने सर्व बॅरिकेड तोडले होते. जात आणि जातीयवाद तोडत त्यांनी ‘बच्चन’ हे नाव स्वीकारले आणि माझा जन्म झाला. या दोघांच्या भेटीचा एक किस्सा बाबूजींच्या ( हरिवंशराय बच्चन) आत्मचरित्रात सांगितलं गेला आहे. तेव्हा पासून आजपर्यंत मी जे पहिले, अनुभवले आहेत ते मी लवकरच तुम्हाला सांगेन.”

आज अमिताभ बच्चन हे नाव एक ब्रँड आहे. या नावात एवढी ताकद आणि आदर आहे की नाव उच्चारताच आपोआप सर्वांच्या नजरेत एक वेगळी चमक निर्माण होते. अमिताभ यांचे ‘बच्चन’ हे त्यांचे परंपरागत नाव नसून त्यांच्या आई, वडिलांनी धारण केलेले नाव आहे. अमिताभ यांनी ‘बच्चन’ हे आडनाव कसे पडले याबाबतचा एक किस्सा देखील शेयर केला आहे.

त्यांनी सांगितले, ” माझे वडील जात आणि जातीच्या सिस्टिमचे कट्टर विरोधी होते. त्यामुळेच त्यांनी ‘बच्चन’ हे नाव स्वीकारले. कारण बच्चन ह्या नावाचा कोणताच अर्थ नाहीये. ना हे नाव कोणत्या जातीचे आहे, नाही कोणत्या गोत्राचे. हे नाव माझ्या वडिलांनी एका कवीच्या नात्याने निवडले होते. मात्र माझ्या जन्मानंतर हे आडनाव संपूर्ण परिवारालच मिळाले. माझ्या वडिलांचा जन्म कायस्थ परिवारातला. त्यांचे आधीचे आडनाव श्रीवास्तव असे होते. ते पूर्वीपासूनच जात आणि जातीयता याविरोधात होते. यातच त्यांनी ‘कवी’ या नात्याने त्यांचे आडनाव ‘बच्चन’ लिहायला सुरुवात केली. त्याकाळी अनेक मोठे कवी त्यांच्या कलाकृतीला त्याचे वेगळे नाव देत असत. मात्र हे नाव आमच्या कुटुंबाचे आडनाव तेव्हा झाले जेव्हा माझा जन्म झाला. शाळेत ऍडमिशन घेण्यासाठी शिक्षकांनी माझे आडनाव विचारले तेव्हा माझ्या आई, वडिलांनी ‘बच्चन’ हे नाव लिहिले. ‘बच्चन’ हे नाव धारण करणारा मी आमच्या घरातला पहिला व्यक्ती आहे.
हरिवंशराय बच्चन हे हिंदी भाषेतील प्रसिद्ध आणि लोकप्रिय लेखक, कवी होते.


Leave A Reply

Your email address will not be published.