उत्तर प्रदेश हे देशातील एक असे राज्य मानले जाते, जिथून बहुतेक लोक आयएएस अधिकारी आणि राजकारणी बनतात. अगदी डोळ्यात भरणारे, वैविध्यपूर्ण संस्कृती आणि सभ्यता असलेले हे राज्य बॉलिवूडसाठी खूप अर्थपूर्ण आहे. कारण उत्तर प्रदेशच्या भूमीने भारतीय चित्रपटसृष्टीला असे विशिष्ट कलाकार दिले आहेत, ज्यांच्याशिवाय चित्रपटसृष्टीची कहाणी अपूर्ण आहे. उत्तर प्रदेशचे स्वतःचे उच्चारण आहे, आपला एक वेगळा अंदाज आहे, जो याच्याशी संबंधित असलेल्या कलाकारांमध्ये चांगलाच दिसून येतो. बॉलीवूडमध्ये टॅलेंट आपल्याला भारताच्या कानाकोपऱ्यात पाहायला मिळतो. पण आपण आज उत्तर प्रदेशात जन्मलेल्या अशा कलाकारांबद्दल जाणून घेऊया, ज्यांनी पुढे जात करियरमध्ये मोठ्ठं नाव केलं.
अमिताभ बच्चन-
शतकाचे सुपरहीरो, बॉलिवूडवर राज्य करणारे अमिताभ बच्चन मूळचे उत्तर प्रदेशचे आहेत. बिग बी यूपीमधील अलाहाबादचे आहेत, ज्याला आता प्रयागराज म्हणतात. बिग बींनी बॉलिवूडमध्ये एकापेक्षा एक हिट चित्रपट दिले आहेत. आजही अमिताभ बच्चन यांच्यासारखे हिंदी भाषिक कलाकार इंडस्ट्रीमध्ये क्वचितच दिसतात.
अनुष्का शर्मा-
अनुष्का उत्तर प्रदेशची असून, चित्रपटांमध्ये अभिनय करण्यासोबतच ती निर्मितीमध्येही तिची क्षमता दाखवत आहे. तिचा जन्म अयोध्येत झाला होता. अनुष्काचे वडील आर्मी अधिकारी आहेत, पण अनुष्काचे स्वप्न चित्रपटात नायिका बनण्याचे होते, जे तीने पुर्ण करुन दाखविले.
नसीरुद्दीन शाह-
यूपीच्या बाराबंकी येथे जन्मलेल्या नसीरुद्दीन शाह यांनी आपल्या अनोख्या अभिनयाने चित्रपटसृष्टीत नाव कमावले. सहाय्यक अभिनेता ते खलनायकापर्यंतच्या भूमिकेत नसीरुद्दीन यांची भूमिका अतुलनीय राहिल्या आहेत. नसीरुद्दीन शाह केवळ अभिनयासाठीच नव्हे तर आपले परखड मत व्यक्त करण्यासाठी देखील प्रसिद्ध आहेत.
राजपाल यादव-
उत्तर प्रदेशात जन्मलेले कलाकार त्यांच्या अभिनयानेच केवळ तुम्हाला चकित करत नाहीत, तर त्यांच्याकडे हसवण्याचे देखील सामर्थ्य आहे. राजपाल यादवही उत्तर प्रदेशचा आहे, ज्याने चित्रपटांमध्ये आपल्या जबरदस्त कॉमेडीने लोकांना खळखळून हसवले. राजपाल हा शाहजहापूर जिल्ह्यातील कुंद्रा शहराचा आहे.
दिशा पटानी-
लाखो तरुणांच्या हृदयावर राज्य अभिनेत्री दिशा पटानीही मूळची उत्तर प्रदेशची आहे. दिशाचा जन्म बरेली येथे झाला होता. मॉडेलिंगनंतर चित्रपटांमध्ये आलेल्या दिशाने आपल्या फिटनेसनेही चाहत्यांची मने जिंकली आहेत.
अनुराग कश्यप-
वास्तविक आयुष्य पडद्यावर दाखवणाऱ्या अनुराग कश्यपचा जन्म उत्तर प्रदेशच्या गोरखपूर येथे झाला. त्याने देहरादून येथून शिक्षण पूर्ण केले आहे. आज अनुराग हा बॉलिवूडमधील सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकांपैकी एक आहे.