Wednesday, July 3, 2024

गुड मॉर्निंगच्या शुभेच्छा देणे बिग बींना पडले महागात, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

बॉलिवूड मेगास्टार अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. अनेकदा फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर आणि ब्लॉगच्या माध्यमातून त्यांच्या चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न असतो. मात्र, अलिकडेच काही युजर्सनी त्यांना जोरदार ट्रोल केले. अशा स्थितीत, अमिताभ बच्चन कुठे गप्प बसणार होते! त्यांनी सर्वांना त्यांच्याच स्टाईलमध्ये उत्तर दिले. खरं तर संपूर्ण प्रकरण असं आहे की, युजर्सनी बिग बींना उशिरा उठल्याबद्दल ट्रोल केलं. पण सुपरहिरोनेही त्यांना योग्य वैयक्तिक उत्तर दिलं.

रविवारी अमिताभ बच्चन यांनी साडेअकरा वाजता चाहत्यांना गुड मॉर्निंगच्या शुभेच्छा दिल्या. यादरम्यान काही चाहत्यांनी त्यांनाही शुभेच्छा दिल्या, तर काहींनी त्यांना दुपारी गुड मॉर्निंग केल्याबद्दल ट्रोल केले. कमेंट सेक्शनमध्ये एका यूजरने लिहिले की, “तुम्हाला असं नाही का वाटत, की तुम्ही खूप लवकर गुड मॉर्निंगच्या शुभेच्छा दिल्या आहेत?” याला उत्तर देत अमिताभ बच्चन म्हणाले, “तुमच्या या टोमण्यासाठी मी आभारी आहे. पण रात्री उशिरापर्यंत मी कामात व्यस्त होतो, आज सकाळी शूटिंग संपले.” (amitabh bachchan trolled for late good morning wishes big b gave befitted reply)

पुढे ते म्हणाले, “सकाळी उशिरा उठलो, त्यामुळे उठल्याबरोबर गुड मॉर्निंगच्या शुभेच्छा दिल्या. हे तुम्हाला दुखावले असेल, तर मला माफ करा.” ट्रोल करत एका युजरने लिहिले, “आज खूप उशीर उतरली. देशीवर आले वाटतं तुम्ही. आजकाल सकाळ 11:30 वाजता होतेय, असे दिसते.” याला उत्तर देताना अमिताभ बच्चन यांनी लिहिले, “स्वयं नहीं पीते, औरों को पिला देते हैं मधुशाला.” अमिताभ बच्चन यांनी ज्याप्रकारे ट्रोल करणाऱ्यांना प्रत्युत्तर दिले आहे, त्यांनी सर्वांची मनं जिंकली आहेत.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

हे देखील वाचा