Monday, March 4, 2024

शूटिंगवेळी वहीदा यांनी खरंच मारली होती अमिताभ बच्चन यांच्या कानाखाली, वाचा काय होती बिग बींची प्रतिक्रिया

भारतीय सिनेसृष्टीवर तब्बल 30 वर्ष राज्य केलेल्या वहीदा रहमान या बॉलिवूडमधील एक प्रतिभावान अभिनेत्री आहेत. त्यांनी त्यांच्या अभिनयाच्या जोरावर अनेक चित्रपट गाजवले आहेत. तेलुगु आणि बंगाली चित्रपटांमध्ये अभिनय केला. वहीदा यांनी त्यांच्या नृत्य आणि अभिनय या दोन्ही कलांनी प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केले. त्यांनी त्यांच्या वयाची 65 वर्ष या इंडस्ट्रीला दिली. एवढ्या मोठ्या करियरमध्ये त्यांच्या आयुष्यात अनेक लहान- मोठे किस्से घडल्या. त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आम्ही तुम्हाला त्यांच्या जीवनातला एक किस्सा सांगणार आहोत. 

एकदा वहीदा (waheeda rehman) ‘द कपिल शर्मा शो’ मध्ये आल्या होत्या, त्यावेळी त्यांनी अमिताभ बच्चन यांच्यासोबत शूटिंग करत असताना घडलेला एक किस्सा सांगितला होता. हा किस्सा आहे ‘रेश्मा आणि शेरा’ चित्रपटाच्या शूटिंग वेळेचा. या सिनेमात वहीदा यांना अमिताभ बच्चन यांच्या गालात मारायचे होते. त्या शूटच्या आधी वहीदा या अमिताभ यांना मजेमध्ये म्हणाल्या होत्या, ‘मी तुमच्या गालात जोरात चापट मारेल.’ मात्र, शूटिंगच्या वेळी त्यांनी खरंच अमिताभ यांना जोरात गालात मारली. त्यानंतर अमिताभ यांचा चेहरा पाहून तिथे उपस्थित असलेल्या सर्वांना जाणवले की, अमिताभ यांना जोरात मारले आहे. (waheeda rehman birthday special : when she slap to amitabh bachchan)

Amitabh Bachchan And Waheeda Rehman
Photo Courtesy: Twitter/Amitabh Bachchan & Youtube/SetIndia

 

शूट संपल्यानंतर अमिताभ यांनी वहिदा यांना म्हटले की, ‘वहीदा जी खूप चांगले होते.’ वहीदा यांनी त्यांच्या एवढ्या मोठ्या करियरमध्ये अमिताभ यांच्या प्रेयसीसोबतच त्यांच्या आईचा देखील रोल साकारला.

वहीदा रहमान यांनी १९७४ साली त्यांच्या शशी रेखा या सह अभिनेत्यासोबत लग्न केले. त्यांना सोहेल आणि काशवी ही दोन मुलं असून, हे फिल्म इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध लेखक आहेत. सन २००० साली वहीदा यांच्या पतीचे आजाराने निधन झाले. सध्या वहीदा मोठ्या पडद्यापासून दूर असल्या, तरी त्या वाईल्ड लाईफ फोटोग्राफी करत आहेत.

‘कागज के फूल’, ‘साहिब बीवी और गुलाम’, ‘गाईड’, ‘काला बाजार’, ‘रूप की रानी चोरों का राजा’, ‘राम और श्याम’ आणि ‘खामोशी’ यांसारख्या अनेक सिनेमांमध्ये त्यांच्या दर्जेदार अभिनयाची जादू त्यांनी पडद्यावर दाखवली होती.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
अमिताभ बच्चनच्या ‘या’ चित्रपटासाठी लागली होती मैल मैलांची रांग, चाहत्यांनी वेडे होऊन केली होती गर्दी
‘छोटो मियाँ बडे मियाँ’च्या वेळी अमिताभ बच्चनला खूप घाबरला होता गोविंदा, कारण जाणून व्हाल थक्क

हे देखील वाचा