उत्तप्रदेशचं मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे गेल्या दोन दिवसापूर्वी माहाराष्ट्र मुंबई दौऱ्यावर हेते. त्याशिवाय त्यांनी राज्यातील अनेक मोठमोठ्यी उद्योजकांची भेट घेतली. त्याशिवाय उद्योजकांनी अत्तरप्रदेशमध्ये पाच लाख कोटी रुपये गुंतवण्याचे आश्वासन दिले. अशी माहिती उत्तरप्रदेश सरकारकडून देण्यात आली. राष्ट्रवादी पक्षाचे आमदार अमोल मिटकरी या दौऱ्याविषयी सोशल मीडियावर एक ट्वीट शेअर केलं आहे जे सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालं आहे.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांना रिलायन्स समूहाचे प्रमुख मुकेश अंबानी (Mukehs Ambani) यांनी युपीमध्ये इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन आणि हरित ऊर्जा क्षेत्रात मोठ्या गुंतवणुकीचे आश्वासन दिलं आहे. त्याशिवाय अदानी समूहाने पीपीपी मॉडेलवर आधारित वैद्यकीय संस्था उभारण्याचे आश्वासन दिल्याची माहिती उत्तर प्रदेश सरकारकडून देण्यात आली आहे.
योगी आदित्यनाथ यांच्या दौऱ्यावर टीका करत त्यांचा आणि मुकेश अंबानी यांचा फोटो शेअर करत मिटकरींनी भाजप पक्षावर आणि आदित्यनाथ यांच्यावर निशाना साधला आहे. मिटकरी यांनी ट्वीट शेअर करत लिहले की, “राज्याला उर्फीमध्ये अडकवून, योगी महाराष्ट्रात येऊन बर्फी घेऊन गेले.” त्याशिवाय त्यांनी #योगी तेरा खेल निराला असं हॅशटॅगही वापरलं आहे. त्यांच्या मते माहाराष्ट्राचं राजकारण उर्फीच्या मुद्द्यामुळे भरकटलं असून त्याचा फायदा योगी यांनी घेताला आहे.
राज्याला उर्फि मध्ये अडकवून, योगी महाराष्ट्रात येऊन बर्फि घेऊन गेले. ????#योगीतेराखेलनिराला pic.twitter.com/4LabL3poTN
— आ. अमोल रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) January 6, 2023
गेल्या अनेक दिवसांपासून अभिनेत्री उर्फी जावेद आणि भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांच्यामध्ये वाद सुरु झाला असून अनेक नेत्यांनी या वादमध्ये सहभागही घेतला होता. मात्र, तरिही प्रकरण अजून सुरुच आहे. चित्रा वाघ यांनी उर्फीच्या कपड्यांवर आक्षेप केला आहे. त्याशिवाय तिच्यावर नंगानाच आणि अश्लीलता पसरवण्याचा आरोप केला आहे. पोलिसात तक्रार केली असून तिला अटक कारावी अशी मागनी चित्रा वाघ यांनी केली आहे. मात्र, ‘कोणाची गोष्ट ऐकेल ती उर्फी कसली’. त्यांच्या आरोपानंतर तर उर्फी सतत फोटो आणि व्हिडिओ शेअर करत आहे.
चित्रा वाघ आणि अभिनेत्री उर्फी जावेद यांच्या वादाला राजकारणी वळण मिळालं आहे त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणाचे मुद्दे भरकटले असून भलत्याच मुद्यावर वाद पेटत आहे.
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
दिलजीत दोसांझ आहे दहावी पास, कंगना रणौतसोबत झालेल्या वादामुळे आला होता चर्चेत
उर्फी जावेदच्या कपड्यांवरून वाद काही थांबेना, आता थेट महिला आयाेगाकडून चित्रा वाघ यांना नाेटीस