Friday, February 14, 2025
Home कॅलेंडर दिलजीत दोसांझ आहे दहावी पास, कंगना रणौतसोबत झालेल्या वादामुळे आला होता चर्चेत

दिलजीत दोसांझ आहे दहावी पास, कंगना रणौतसोबत झालेल्या वादामुळे आला होता चर्चेत

गायक दिलजीत दोसांझने पंजाबी सिनेमातच नाही, तर बॉलिवूडमध्येही स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. दमदार अभिनयासोबतच दिलजीत त्याच्या उत्कृष्ट गाण्यांसाठी ओळखला जातो. त्यांनी पंजाबीसह बॉलिवूडला अनेक हिट गाणी दिली आहेत. दिलजीतला पंजाबचा रॉकस्टार म्हटले जाते. त्याने यापूर्वी पंजाबमध्ये अनेक चांगल्या आणि जबरदस्त चित्रपटांमध्ये काम केले आहे आणि संगीत अल्बम देखील केले आहेत. 2016 मध्ये त्याने ‘उडता पंजाब’मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. पहिल्याच चित्रपटात दिलजीतचा निरागस अभिनय प्रेक्षकांना खूप आवडला. बॉलिवूडमध्येही त्याची जबरदस्त फॅन फॉलोविंग आहे. त्याचे ‘इक कुडी’ हे गाणंही चाहत्यांना आवडले. दिलजीत शुक्रवारी (6 जानेवारी) त्याचा 38वा वाढदिवस साजरा करत आहे.

कंगनाशी घेतला होता पंगा

पहिल्या चित्रपटानंतर, दिलजीतची (Diljit dosanjh) फॅन फॉलोअर्स इतकी वाढली की, त्याला सहाय्यक भूमिकांमधून मुख्य भूमिका देखील मिळू लागल्या. ‘उडता पंजाब’ नंतर तो फिल्लौरी, ‘वेलकम टू न्यूयॉर्क’, ‘सूरमा’ आणि ‘गुड न्यूज’ सारख्या चित्रपटांमध्ये दिसला. आजही दिलजीतच्या चाहत्यांची कमी नाही. दिलजीत त्याच्या कॉमिक टायमिंगसाठी ओळखला जातो. दिलजीत हा असा सेलिब्रिटी आहे, ज्याने कंगना रणौतचीही (Kangana Ranaut) बोलती बंद केली आहे. शेतकरी आंदोलनादरम्यान त्याने सोशल मीडियावर थेट कंगनाशी पंगा घेतला होता.


कंगनाने ट्वीट केले होते डिलीट

सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल झाला होता. या फोटोमध्ये भटिंडातील महिंदर कौर ही वृद्ध महिला शेतकरी आंदोलनात सहभागी होताना दिसत होती. हा फोटो शेअर करून कंगनाने या महिलेची तुलना शाहीन बागच्या बिल्किस दादीशी केली. ज्याचा एक व्हिडिओ दिलजीतने शेअर केला. त्यानंतर संपूर्ण वाद सुरू झाला आणि खरंतर, कंगनाचे म्हणणे चुकीचे निघाले. कंगनाला तिचे ट्वीट डिलीट करावे लागले.


कंगना दिलजीतला म्हणाली पाळीव प्राणी

कंगनाच्या या फेक ट्वीटसाठी दिलजीतने तिला बरेच काही ऐकवले होते. यानंतर कंगनाने दिलजीतला करण जोहरचा पप्पी आणि स्थानिक क्रांतिकारकही म्हटले. कंगनाने ट्वीट करून म्हटले होते की, “ओ करण जोहरच्या पाळीव प्राणी, जी आजी शाहीन बागेत तिच्या नागरिकत्वासाठी आंदोलन करत होती, तीच बिल्किस बानो शेतकऱ्यांच्या एमएसपीसाठी आंदोलन करताना दिसली होती. मी महिंद्रा कौर जी यांना ओळखतही नाही. तुम्ही नाटक सुरू केले आहे का? आता थांब.”

काय म्हणाला दिलजीत?

कंगनाची ही गोष्ट दिलजीतला आवडली नाही आणि कंगनाला चोख प्रत्युत्तर देताना दिलजीतने लिहिले की, “तू सर्व लोकांसोबत चित्रपट केला, तू त्या लोकांचे पाळीव प्राणी आहात? मग मालकांची यादी लांबणार? ते बॉलिवूडचे नाहीत, पंजाबचे आहेत. खोट बोलून लोकांना भडकवणे आणि भावनांशी खेळणे, हे तुला चांगलंच माहीत आहे.”

दिलजीतने पुढे लिहिले की, “मी तुला सांगतोय की, हे बॉलिवूडचे लोक नसून पंजाबचे लोक आहेत. तू २ ऐकवशील तर तुला ४ नाहीतर ३६ ऐकायला मिळेल. ये, ये, तू जेवढी नाटक केली आहेत, ती पंजाबची जनताच काढेल आणि तू कोणाच्याही हाती येणार नाही.” बराच वेळ दोघांमधील वाद चालू होता.

दिलजीत आहे दहावी पास

तुमचा आवडता गायक दिलजीत फक्त दहावी पास आहे. पंजाबमधील दिलजीतने कलान या गावात सुरुवातीचे शिक्षण घेतले आणि नंतर तो लुधियाना येथे गेला. वडील पंजाब रोडवेजमध्ये काम करायचे. त्यावेळी दिलजीतच्या घरची आर्थिक परिस्थिती हलाखीची होती. त्यामुळे त्यांनी गुरुद्वारात कीर्तन गायला सुरुवात केली. आवाज छान होता, पण दिलजीत शास्त्रीय गायनही शिकला होता. त्यामुळे सर्वांना हा आवाज आवडू लागला. मिळालेल्या माहितीनुसार, गुरुद्वारामध्ये कीर्तनानंतर त्यांनी लग्न समारंभात गाणे देखील सुरू केले. (singer diljit dosanjh celebrating 37th birthday today know her controversy with kangana ranaut)

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
मसकली गाण्याच्या रिमेकवर ए.आर रेहमान यांची नाराजी? म्हणाले, ‘मुळ गाणे बनवायला 365 दिवस…’

ए पळा पळा..! गायिकेने असा काही सुर छेडला की, माणसांसह कुत्र्या-मांजरांची झाली पळापळ, पाहा रेहमानने शेअर केलेला भन्नाट व्हिडिओ

हे देखील वाचा