आपल्या भारदस्त आवाजाने आणि जिवंत अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे आणि ‘मोगॅम्बो खूश हुआ..’ हा संवाद अजरामर करणारे अभिनेते अमरीश पुरी (Amrish Puri) यांची आज पुण्यतिथी. भारतीय चित्रपटातील सर्वाधिक प्रतिभासंपन्न अभिनेत्यांपैकी एक असलेल्या अमरीश पुरी यांची आज बुधवारी (२२ जून) त्यांची जयंती आहे. त्यानिमित्त जाणून घेऊया त्यांचा प्रवास…
एकूण ४५० चित्रपटांमध्ये काम करणाऱ्या अमरीश पुरी यांनी त्यांच्या आवाजाने आणि अभिनयाने बॉलिवूडमध्ये स्वतःचे अढळ स्थान तयार केले. अमरीश पुरी यांनी फक्त मसाला चित्रपटातंच काम केले असे नाही. त्यांनी ‘अर्धसत्य’, ‘निशांत’, ‘मंथन’ यांसारख्या आशयसंपन्न चित्रपटांमध्ये काम केले. अभिनेता मदन पुरी यांचे अमरीश पुरी भाऊ होते. मात्र असे असूनही अमरीश यांच्यासाठी चित्रपटांमध्ये काम करणे तितकेसे सोपे नव्हते. भाऊ चांगला अभिनेता असूनही अमरीश यांना चित्रपटांमध्ये काम मिळत नव्हते. (amrish puri know interesting facts about him on death anniversary)
पन्नासच्या दशकात कोमल आवाज असणारा, साधा, नाजूक, गोड चेहऱ्याचा अशी नायकाची व्याख्या होती. मात्र अमरीश यापैकी कोणत्याही शब्दात बसत नव्हते. त्यामुळे अनेक ऑडिशन देऊनही अमरीश यांना काम मिळत नव्हते. त्यांना त्यांच्या दिसण्यामुळे आणि जाड आवाजामुळे सतत नकार मिळायचे. मग अमरीश यांनी नाटकांकडे त्यांचा मोर्चा वळवला.
त्यांनी काही वर्ष नाटकांमध्ये काम केले. त्यासोबतच ते मध्ये मध्ये काही कमर्शियल चित्रपटांमध्ये छोटे छोटे रोल करत होते. १९७० साली देव आनंद यांच्या ‘प्रेमपुजारी’ या सिनेमात त्यांनी एक छोटी भूमिका निभावली. वयाच्या ३८ व्या वर्षी म्हणजे १९७५ साली अमरीश यांनी श्याम बेनेगल यांच्या ‘निशांत’ चित्रपटात त्यांनी जमीनदाराच्या भूमिका निभावली. या भूमिकेमुळे त्यांना बऱ्यापैकी लोकप्रियता मिळाली, आणि सोबतच त्यांच्या अभिनयाचे देखील त्यांचे कौतुक झाले. असे असूनही कमर्शियल चित्रपटांमध्ये यश मिळवण्यासाठी त्यांना १९८० सालापर्यंत वाट पाहावी लागली.
साल १९८०मध्ये आलेल्या ‘हम पांच’ चित्रपटातून अमरीश पुरी यांना खरी ओळख आणि लोकप्रियता मिळाली. याच सिनेमानंतर त्यांचा खलनायक साकारण्याची सुरुवात झाली. स्टीवन स्पिलबर्ग यांचा भारतीय चित्रपट ‘इंडियाना जोंस एंड टेम्पल ऑफ़ डूम’ मध्ये त्यांनी ‘मोला राम’ ही भूमिका निभावली. या भूमिकेने अमरीश यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख मिळून दिली.
अमरीश पुरी यांचा जन्म २२ जून १९३२ रोजी पंजाबमधील नवांशहर येथे झाला. अमरीश यांचे दोन भाऊ चमन पुरी आणि मदन पुरी हे चित्रपटांमध्ये काम करायचे. पडद्यावर खूप खतरनाक खलनायक साकारणारे अमरीश पुरी त्यांच्या खऱ्या आयुष्यात खूप शांत आणि त्यांच्या परिवारावर प्रेम करणारे होते. अमरीश यांना गाड्यांची खूप आवड होती. आज त्यांच्या पुण्यतिथीच्या दिवशी आपण पाहूया त्यांनी अजरामर केलेल्या काही भूमिका.
मिस्टर इंडिया
साल १९८७मध्ये आलेला ‘मिस्टर इंडिया’ हा सिनेमा त्याकाळी प्रचंड यशस्वी झाला. अमरीश पुरी यांच्या खलनायकी भूमिकेमुळेही हा चित्रपट तितकाच गाजला. या सिनेमात त्यांनी साकारलेली ‘मोगॅम्बो’ ही भूमिका आजही खूप हिट आहे. त्यांचा ‘मोगॅम्बो खूश हुआ..’ हा संवाद आजही लोकांच्या तोंडावर येत असतो.
नगिना
साल १९८६मध्ये आलेला श्रीदेवी आणि ऋषी कपूर अभिनित ‘नगिना’ हा सिनेमा खूप गाजला. या चित्रपटात अमरीश यांनी एका तांत्रिक गारुड्याची खलनायकी भूमिका साकारली होती. या चित्रपटातला ‘अलख निरंजन बोलत’ हा संवादही त्यावेळी खूप हिट झाला.
करण-अर्जुन
शाहरुख खान आणि सलमान खान अभिनित १९९५ साली आलेला करण – अर्जुन सिनेमात अमरीश पुरी यांनी ठाकूर दुर्जनसिंग ही भूमिका निभावली. या सिनेमात अमरीश पुरी यांच्या अभिनयापुढे लोकं शाहरुख, सलमानलाही विसरले होते.
लोहा
अमरीश पुरी यांना जेव्हा जेव्हा त्यांच्या नकारत्मक भूमिकेसाठी आठवले जाईल तेव्हा त्यांचा १९८७ साली आलेला ‘लोहा’ हा सिनेमा नक्कीच आठवला जाईल. या सिनेमात त्यांनी साकारलेला खलनायक त्यांच्या करियरमधला सर्वात खतरनाक व्हिलन होता. या सिनेमात त्यांच्या अभिनयासोबतच त्यांचा लूकही खूप घाबरवणारा होता.
कोयला
शाहरुख खान आणि माधुरी दीक्षित अभिनित १९९७ साली आलेल्या कोयला या सिनेमात त्यांनी ‘राजा साहेब’ ही नकारात्मक भूमिका साकारली होती.
नायक
साल २००१मध्ये आलेला अनिल कपूरचा ‘नायक’ हा सिनेमा खूप गाजला. या चित्रपटातली अमरीश यांची मुख्यमंत्र्यांची भूमिका आजही खूप हिट आहे. आपली खूर्ची वाचवण्यासाठी राजकारण करणारा बलराज चौहान आजही लोकांना राग आणल्याशिवाय राहत नाही.
गदर
२००१ साली आलेल्या अमीषा पटेल आणि सनी देओल यांचा ‘गदर’ हा सिनेमा खूप यशस्वी झाला. या प्रेमकथेचा अमरीश पुरी यांनी पाकिस्तानी राजकारणाची भूमिका निभावली होती. ज्याला भारतावर पाय ठेवायलाही आवडत नाही.
‘मिस्टर इंडिया’, ‘शहेनशाह’, ‘करण-अर्जून’, ‘कोयला’, ‘दिलजले’, ‘विश्वात्मा’, ‘राम-लखन’, ‘तहलका’, ‘गदर’, ‘नायक’, ‘दामिनी’ या सारख्या चित्रपटात त्यांनी नकारात्मक भूमिका साकारल्या. या चित्रपटांना सुपरहिट करण्यात त्यांचे मोठे योगदान होते.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा :