हिंदी अभिनेत्रींच्या मैत्रीची आणि एकत्र घालवलेल्या क्षणांच्या सुंदर फोटोंची नेहमीच सोशल मीडियावर चर्चा पाहायला मिळते. यामध्ये शानदार बर्थडे पार्ट्यांचा प्रामुख्याने समावेश असलेला पाहायला मिळतो. सध्या सोशल मीडियावर अशाच खास मैत्रीणींच्या फोटोची सर्वत्र चर्चा रंगलेली पाहायला मिळत आहे. नक्की कोण आहेत या अभिनेत्री चला जाणून घेऊ.
हिंदी सिनेसृष्टीत सर्वात जास्त चर्चा होत असते ती अमृता अरोरा आणि अभिनेत्री करीना कपूरच्या मैत्रीची. दोघींच्या घट्ट आणि जिवलग मैत्रीचे अनेक किस्से ऐकायला मिळत असतात.त्यामुळेच आपल्या खास मैत्रिणीचा वाढदिवस आहे आणि तिथे करीना कपूर उपस्थित नसणे शक्यच नाही. आता तुमच्या लक्षात आले असेल की, नक्की कशाची चर्चा सुरु आहे. नुकताच अमृता अरोराचा वाढदिवस साजरा करण्यात आला ज्यावेळी या सर्व आघाडीच्या अभिनेत्री जल्लोष करताना दिसून आल्या आहेत. या वाढदिवसाचे फोटो सध्या सर्वत्र व्हायरल होत आहेत.
अमृता अरोराच्या वाढदिवसानिमित्त तिची बहिण मलायका अरोरा, तिची जिवलग मैत्रीण करीना कपूर आणि करिश्मा कपूर जोरदार धमाल करताना दिसून आल्या आहेत. या जंगी सेलिब्रेशनचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. यामध्ये सिनेसृष्टीतील प्रमुख अभिनेत्री धमाल करताना दिसत आहेत. मलायकाप्रमाणेच करिश्मा कपूरनेही आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर या वाढदिवसाचा फोटो शेअर केला आहे, या फोटोमध्ये सगळेजण बर्थडे गर्ल अमृताला मिठी मारताना दिसत आहेत. अमृताची जिवलग मैत्रीण अभिनेत्री करीना कपूरने वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना ‘मेरी अमु’ असे कॅप्शन दिले आहे. तिच्या या वाढदिवसाच्या पोस्टला अमृतानेही शेअर केले आहे.
दरम्यान बॉलिवूड कलाकार अशा अनेक कार्यक्रमात एकत्र येत धमाल करताना पाहायला मिळतात. अलिकडेच फॅशन डिझायनर मनीष मल्होत्राने सोशल मीडियावर एका गेट टू गेदरचे फोटो शेअर केले होते. ज्यामध्ये करीना, मलाइका, अमृता अरोरा आणि करण जोहर सहभागी झाले होते. या फोटोंना सोशल मीडियावर शेअर करत ”मित्रांसोबत योग्य वेळी” असे कॅप्शन लिहिले होते.
हेही वाचा :