Sunday, February 23, 2025
Home कॅलेंडर ‘या’ क्रिकेटपटूच्या प्रेमात वेडी होती अमृता अरोरा, नंतर स्वतःच्याच मैत्रिणीच्या पतीसोबत थाटला संसार

‘या’ क्रिकेटपटूच्या प्रेमात वेडी होती अमृता अरोरा, नंतर स्वतःच्याच मैत्रिणीच्या पतीसोबत थाटला संसार

मलायका अरोराची (Malaika Arora) धाकटी बहीण आणि बॉलिवूड अभिनेत्री अमृता अरोरा (Amrita Arora) सोमवारी (३१ जानेवारी) ४४ वर्षांची झाली आहे. तिचा जन्म ३१ जानेवारी १९७८ रोजी मुंबईत झाला. मॉडेल, टीव्ही प्रेझेंटर आणि व्हीजे अमृता हिने अभिनयात करिअर करण्याचा निर्णय घेतला आणि २००२ मध्ये ‘कितने दूर कितने पास’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. तिने तिच्या संपूर्ण कारकिर्दीत केवळ २१ चित्रपटांमध्ये काम केले. मात्र, तिला बॉलिवूडमध्ये छाप पाडण्यात यश आले नाही आणि तिने चित्रपटांपासून अंतर राखणे पसंत केले.

अमृताने २००९मध्ये कन्स्ट्रक्शन इंडस्ट्रीतील बिझनेसमॅन शकील लडाकशी लग्न केले. या जोडप्याला दोन मुलं आहेत. कदाचित कमी लोकांना माहित असेल की, अमृताने ज्या माणसाशी लग्न केले तो तिच्या खास मैत्रिणीचा पती होता. ती जेव्हा शकीलला भेटली, तेव्हा तो आधीच विवाहित होता. त्याच्या पहिल्या पत्नीचे नाव निशा राणा आहे. विशेष म्हणजे निशा ही अमृताची जवळची मैत्रीण होती.

अमृता आणि शकीलच्या मैत्रीचे हळूहळू प्रेमात रुपांतर झाले आणि एक वेळ अशी आली की, दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. शकीलने पत्नी निशाला घटस्फोट देऊन अमृताशी लग्न केले. त्यावेळी अमृता लग्नाआधीच गरोदर राहिली होती आणि तिने शकीलसोबत घाईघाईत लग्न केले होते, अशा बातम्या मीडियामध्ये पसरल्या होत्या.

निशाचा शकीलसोबत घटस्फोट झाला, तेव्हा तिने अमृतावर तिचे वैवाहिक जीवन उद्ध्वस्त केल्याचा आरोप केला होता. निशाने मुलाखतीत अमृतावर जाहीरपणे आरोप केला की, तिने तिचा नवरा चोरला. प्रथम तिने तिचे कपडे आणि इतर गोष्टी वापरल्या, नंतर तिच्या पतीलाच चोरले, असे निशा म्हणायची.

शकीलच्या आधी अमृताचे हृदय एका क्रिकेटरवरही आले होते. २००४मध्ये अमृताचे हृदय क्रिकेटर उस्मान अफजलवर आले. उस्मानही अमृताच्या बाबतीत खूप गंभीर होता. दोघेही सर्वत्र एकत्र दिसू लागले. त्यांची लव्हस्टोरी मीडियामध्ये खूप चर्चेत राहिली. बातमीनुसार, अमृताला तिचा बॉयफ्रेंड उस्मानसोबत लांबचा प्रवास करायचा होता. पण दोघांचे नाते शेवटपर्यंत पोहोचले नाही.

हेही वाचा :

हे देखील वाचा