Saturday, March 2, 2024

‘चंद्रमुखी’च्या वादावर अमृता खानविलकरने दिले सडेतोड उत्तर; म्हणाली, ‘वृत्ती कधीच…’

अमृता खानविलकर सतत कोणत्या ना कोणत्या करणाने चर्चेत असते. अमृता खानविलकरने तिच्या अभिनयाच्या जोरावर खूप प्रसिद्धी मिळवली आहे. तिचे लाखो चाहते आहेत. अमृता खानविलकरने नुकतेच तिच्या यूट्यूब चॅनेलवर ‘दिलखुलास गप्पा’ या नवीन सीरिजचा पहिला भाग प्रदर्शित केला. या भागात तिने तिच्या चाहत्यांशी मनमोकळ्या गप्पा मारत त्यांच्या प्रश्नांची उत्तरं दिली. यावेळी अमृताला तिच्या एका चाहतीने तिला ‘चंद्रमुखी‘ चित्रपटादरम्यान निर्माण झालेल्या वादावर प्रश्न विचारला.

चाहतीने प्रश्न विचारताना लिहिते की, “हॅलो अमू…चंद्रमुखीच्या वेळेस मानसी नाईक खूप काही बोलली होती, तसंच तुझ्यावर तिने अनेक आरोप केले. पण, या सगळ्यात तू कधीच काही बोलली नाहीस. याबद्दल आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. कारण, या सगळ्यात तुझी प्रतिमा नकारात्मक होणं योग्य नाही.”

या प्रश्नावर अमृताने (Amrita Khanvilkar) सांगितले, “चंद्रमुखी’ हा एक सुंदर चित्रपट होता आणि त्यात मी एक महत्त्वाची भूमिका साकारली होती. या चित्रपटाबद्दल मला फक्त सकारात्मक गोष्टी बोलायला आवडतात. मानसी नाईक यांनी ज्या गोष्टी बोलल्या त्याबद्दल मी कधीही काही बोलणार नाही. मला वाटते की प्रत्येकजण संघर्ष करतो आणि म्हणूनच आपल्यातील चांगली वृत्ती कधीच सोडायची नाही. मी नेहमीच सगळ्यांचं चांगलं व्हावं असा सकारात्मक विचार करेन.”अमृताच्या या उत्तरावर तिच्या चाहत्यांनी आनंद व्यक्त केला आहे. अनेकांनी तिच्या सकारात्मक विचारसरणीचं कौतुक केलं आहे. दरम्यान, अमृता खानविलकरच्या आगामी चित्रपटांबद्दल सांगायचं झालं तर, लवकरच ती प्रेक्षकांना ‘कलावती’ आणि ‘पठ्ठे बापूराव’ या चित्रपटांमध्ये प्रमुख भूमिकेत पाहायला मिळणार आहे. अमृताचा ‘चंद्रमुखी’ हा चित्रपट 29 एप्रिल 2022 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटाला खूप प्रसिद्धी मिळाली. (Amrita Khanvilkar gave a cracking answer to the Chandramukhi controversy)

आधिक वाचा-
सुरेश वाडकर यांना आवडत नव्हती ए. आर. रेहमानची काम करण्याची पद्धत, सेवार्थ केला खुलासा
ना कोणता चित्रपट, ना अभिनयात कुशल, तरीही सोशल मीडियावर यांचाच बोलबाला

हे देखील वाचा