गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक नाट्यमय घडामोडी पाहायला मिळाल्या होत्या. त्यानंतर आता भाजपा आणि शिंदे गटाची सत्ता आली आहे. या सत्ता बदलाबरोबरच माध्यमांमध्ये अमृता फडणवीस यांच्या नावाच्याही माध्यमांमध्ये पुन्हा एकदा चर्चा होताना दिसत आहे.उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadanvis) राज्याच्या राजकारणात नेहमीच चर्चेत असतात. पण सध्या त्या त्यांच्या नवीन गाण्याच्या पोस्टमुळे चर्चेत आल्या आहेत. काय आहे हे नेमके प्रकरण चला जाणून घेऊ.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. कधी राजकीय विषयांंवर तर कधी विरोधकांवर त्या त्यांच्या खास शैलीत टिका करताना दिसत असतात. सोशल मीडिया प्रमाणेच त्या त्यांच्या गाण्यांमुळेही अनेकदा चर्चेत येत असतात. आत्तापर्यंत अमृता फडणवीस यांची अनेक गाणी व्हायरल झाली आहेत. या गाण्यांना प्रेक्षकांचाही जोरदार प्रतिसाद पाहायला मिळाला होता. आता पुन्हा एकदा त्यांचे नवीन गाणे येणार असल्याची माहिती समोर आली आहे.
लेकर आ रही हूँ एक यादगार गीत पुराना….
लफ़्ज़ नए है ,
पर रंग वही सुहाना …… !Thank you @saregamaglobal
Coming up ….#goldenmelody #recreation #Mukesh pic.twitter.com/fH8fhuDVY1
— AMRUTA FADNAVIS (@fadnavis_amruta) July 15, 2022
याबद्दलचे अमृता फडणवीस यांचे ट्विट सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहे. यामध्ये त्यांनी लेकर आ रहीं हू, एक यादगार गीत पुराणा, लफ्ज नए है, पर रंग वही पुराणा असा कॅप्शन दिला आहे. त्यांच्या या पोस्टवरुन लवकरच त्यांचे नवीन गाणे प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचे दिसत आहे. याआधीही त्यांच्या गाण्यांची सोशल मीडियावर तुफान चर्चा रंगल्या होत्या. राजकीय नेत्याच्या पत्नीसोबतच एक सोशल मीडिया सेंन्सेशन म्हणून अमृता फडणवीस यांनी नवीन ओळख तयार केली आहे.