Sunday, May 19, 2024

अंमली पदार्थांच्या आहारी गेला होता संजय दत्त, ‘देवदूत’ बनून कुमार गौरवने उचललं ‘हे’ मोठ्ठं पाऊल

अभिनेता संजय दत्तने (Sanjay Dutt) त्याच्या कारकिर्दीत ‘वास्तव’, ‘मुन्ना भाई एमबीबीएस’, ‘लगे रहो मुन्ना भाई’, ‘कारतूस’, ‘खलनायक’ आणि ‘अग्निपथ’मध्ये काम केले आहे. त्याने सिनेसृष्टीला एकापेक्षा एक हिट चित्रपट दिले आहेत. ‘रॉकी’ या चित्रपटातून संजय दत्त रातोरात स्टार झाला. पण एका क्षणी ड्रग्जच्या व्यसनामुळे त्याची कारकीर्द संपुष्टात येऊ लागली होती. त्या काळात संजय दत्त अंमली पदार्थांच्या व्यसनाचा बळी ठरला होता. त्या काळात, त्याचा दाजी आणि प्रसिद्ध अभिनेता कुमार गौरव (Kumar Gaurav) याने संजयला त्याची कारकीर्द पुन्हा रुळावर आणण्यासाठी पाठिंबा दिला होता. आज शुक्रवारी (२९ जुलै) संजय दत्त त्याच्या वाढदिवस साजरा करत आहे. जाणून घेऊया त्याच्याबाबत माहिती..

कुमार गौरवची साथ
संजय दत्तचे करिअर डबघाईला आले होते, तेव्हा अभिनेता कुमार गौरवने त्याच्यासोबत ‘नाम’ चित्रपटाची निर्मिती केली. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. या चित्रपटातून संजय दत्तने पुन्हा एकदा स्वत:ला सिद्ध केले. अभिनेता कुमार गौरव त्याच्या पहिल्या लव्ह स्टोरी चित्रपटाने रातोरात स्टार झाला. या चित्रपटात त्यांच्यासोबत विजया पंडितही (Vijaya Pandit) होती. दोघांची जोडी खूप पसंत केली गेली. (when sanjay dutt brother in law kumar gaurav help him)

कुमार गौरव आणि संजय दत्त
अभिनेता कुमार गौरवने संजय दत्तची बहीण नम्रता दत्तसोबत लग्न केले आहे. संजय दत्तने एकदा एका मुलाखतीत सांगितले होते की, तो कुमार गौरववर खूप प्रेम करतो आणि तो त्याच्यासाठी जीवही देऊ शकतो. नम्रता दत्तशी लग्न करण्यापूर्वी त्याला विजयता पंडितशी लग्न करायचे होते. परंतु वडिलांनी या लग्नाला नकार दिला. कुमार गौरवच्या वडिलांची इच्छा होती की, त्यांनी राज कपूर (Raj Kapoor) यांच्या मुलीशी लग्न करावे. अखेर नम्रता दत्तसोबत त्याचे लग्न झाले.

सध्या संजय दत्त त्याच्या आगामी ‘शमशेरा’ या चित्रपटासाठी खूप उत्सुक आहे. २२ जुलै रोजी त्याचा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. याआधी त्याने ‘KGF 2’ या चित्रपटात अधीराच्या भूमिकेतून वाहवा मिळवली. त्याची व्यक्तिरेखा खूप पसंत केली गेली.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा

हे देखील वाचा