Tuesday, July 9, 2024

अमृता फडणवीस यांच्या ‘आज मैं मूड बना लिया’ या नवीन गाण्याचा टीझर प्रदर्शित

अमृता फडणवीस यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांची पत्नी ही ओळख मागे सारत स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. एक गायिका म्हणून त्या नावारूपास आल्या आहेत. याशिवाय अमृता फडणवीस प्रत्यक्ष राजकारणात सक्रिय नसल्या तरी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्या नेहमीच विविध मुद्द्यांवर त्यांनी मतं मांडताना दिसतात. त्यांच्या सोशल मीडिया पोस्ट देखील तुफान व्हायरल होत असतात. मात्र या सर्वांमध्ये अमृताजी यांनी एक गायिका म्हणून स्वतःला प्रस्थापित केले आहे. त्यांचे आतापर्यंत हिंदी आणि मराठी भाषांमध्ये गाणी प्रदर्शित झाली असून, ती गाणी गाजली देखील आता पुन्हा एकदा अमृता या त्यांच्या फॅन्ससाठी नवीन गाण्याची मेजवानी घेऊन आल्या आहेत.

मागील बऱ्याच काळापासून त्यांच्या या गाण्याची तुफान चर्चा होती. आता नुकताच त्यांच्या नवीन गाण्याचा टीझर प्रदर्शित झाला आहे. ‘आज मैं मूड बना लिया’ असे त्यांच्या आगामी गाण्याचे बोल असून, हे गाणं पंजाबी भाषेत असणार आहे. टी सीरिज’च्या या गाण्याचा टीझर नुकताच त्यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून शेअर केला आहे. या टीझरमध्ये अमृता गाण्याबरोबरच डान्सही करताना दिसत असून त्यांचा वेस्टर्न लूक सर्वांच्याच चर्चेचा विषय बनला आहे.

अमृता फडणवीस यांचे हे नवीन गाणे बीचवर शूट झाले असून, या गाण्यात बीच कल्चर दिसून येत आहे. शिवाय अमृता यांचा अंदाज, लूक आणि स्टाईल सर्वच आकर्षक असून त्यांचा लूक सोशल मीडियावर चांगलाच गाजताना दिसत आहे. अमृता फडणवीसांचे ‘आज मैं मूड बना लिया’ हे नवीन गाणे बॅचलर्सवर आधारित हे गाणे येत्या ६ जानेवारीला प्रदर्शित होणार आहे.

अमृता फडणवीस या एक बँकर असून गायन हे त्यांचे प्रेम आहे. आतापर्यंत त्यांची ‘वो तेरे प्यार का गम’, ‘शिव तांडव स्रोतम’, ‘तेरी मेरी फिर से’, ‘बेटिया’ आदी गाणी तुफान हिट झाली. एवढेच नाही तर त्यांनी ‘फिर से’ या गाण्याच्या निमित्ताने महानायक अमिताभ बच्चन यांच्यासोबत देखील काम केले आहे.

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
मसकली गाण्याच्या रिमेकवर ए.आर रेहमान यांची नाराजी? म्हणाले, ‘मुळ गाणे बनवायला 365 दिवस…’

ए पळा पळा..! गायिकेने असा काही सुर छेडला की, माणसांसह कुत्र्या-मांजरांची झाली पळापळ, पाहा रेहमानने शेअर केलेला भन्नाट व्हिडिओ

हे देखील वाचा