सिद्धार्थ मल्होत्रा आणि तारा सुतारिया यांच्यावर चित्रित केलेले ‘मसकली 2.0’ हे रिमेक गाणे बुधवारी प्रदर्शित झाले. सध्या या गाण्याची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे. हे गाणे प्रदर्शित झाल्यापासून मुळ गाण्याचे गायक ए. आर रेहमान काय प्रतिक्रिया देणार याबद्दल सर्वांनाच उत्सुकता लागली होती. आता याबद्दलची ए. आर रेहमान यांची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे ज्याने सर्वांचेच लक्ष वेधले आहे.
एआर रहमानने ‘मसकली’च्या रिमिक्स व्हर्जनवर भाष्य करणे टाळले पण मूळ गाण्याबद्दल बोलण्यासाठी ट्विट केले आहे. त्यांनी ट्विटरवर एक नोट शेअर केली ज्याच्या”मूळ ‘मसकाली’चा आनंद घ्या.” नोटमध्ये लिहिले आहे, “कोणताही शॉर्ट कट नाही. हे करण्यासाठी झोप घालवली आहे. हे पुन्हा पुन्हा लिहिले गेले. 200 हून अधिक संगीतकारांनी 365 दिवसांच्या चिंतनानंतर अनेक पिढ्या ऐकता येणारे संगीत तयार केले. दिग्दर्शक, संगीतकार आणि गीतकारांची एक टीम, ज्याला अभिनेते, नृत्य दिग्दर्शक आणि चित्रपटातील कलाकारांनी पाठिंबा दिला आहे. खूप प्रेम आणि आशीर्वाद. असा कॅप्शन दिला आहे.
एआर रहमान यांचे चाहतेही त्यांच्या समर्थनात उतरले आणि त्यांनी आपला राग ट्विटरवर शेअर केला. एका चाहत्याने लिहिले, ‘जगातील सर्वात अहिंसक व्यक्तीला राग आणण्यासाठी काय करावे लागते ते आता आम्हाला कळले आहे.’ दुसर्या एकाने, ‘एआर रहमान सर मी तुमच्यासोबत आहे. मी फक्त मूळ गाण्यांना सपोर्ट करेन आणि रिमिक्स आणि रिमेकला विरोध करेन, असे म्हणत त्यांचे समर्थन केले आहे.
दरम्यान मूळ गाणे 2009 मध्ये आलेल्या ‘दिल्ली 6’ या चित्रपटातील आहे, ज्यात अभिषेक बच्चन आणि सोनम कपूर यांची भूमिका होती. हे गाणे ए आर रहमान यांनी संगीतबद्ध केले आहे, प्रसून जोशी यांनी लिहिले आहे आणि मोहित चौहान यांनी गायले आहे. या गाण्याचे रिक्रिएट व्हर्जन तुलसी कुमार आणि सचेत टंडन यांनी गायले असून संगीत तनिष्क बागची यांनी दिले आहे. संगीतप्रेमींच्या मोठ्या वर्गाने त्यावर टीका केली आणि ट्विटरवर मीम्स तयार करून प्रतिक्रिया दिल्या.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
रोमियो-ज्युलिएटमध्ये, दिग्दर्शकाने फसवणूक करून मिळवले नग्न दृश्य, कलाकारांनी गुन्हा दाखल करत केली करोडोंची मागणी
वाढदिवस विशेष! संगीताचा बादशाह म्हणजे ए.आर. रहमान, वाचा कधीही न ऐकलेली त्याच्या ‘धर्मांतराची’ गोष्ट