Thursday, June 12, 2025
Home टेलिव्हिजन चित्रा वाघ आणि उर्फीच्या वादात अमृता फडणवीस स्पष्टच म्हणाल्या, ‘उर्फी जे करतेय ते मला….’

चित्रा वाघ आणि उर्फीच्या वादात अमृता फडणवीस स्पष्टच म्हणाल्या, ‘उर्फी जे करतेय ते मला….’

गेल्या अनेक दिवसांपासून उर्फी जावेद आणि चित्रा वाघ यांच्यामध्ये वाद सुरुच आहे. एकीकडे सत्तासंघर्षाचा खेळ तर दुसरीकडे या दोघींचा सोशल मीडिया वॉर. उर्फीच्या कपड्यावर निशानासाधत चित्रा वाघ म्हणाल्या होत्या की, ‘समाजामध्ये अश्लीलता पसरवण्याचं काम करत आहे. असा नंगानाच महाराष्ट्रामध्ये खपवून घेणार नाही. त्याशिवाय उर्फी कुठे भेटली तर तीला थोबडवून काढेल.’ असं चित्रा वाघ उर्फीला म्हणाल्या होत्या. उर्फी देखिल शांत बसरणाऱ्यातली नाही दिने दखिल चित्रवा वाघ यांना परखड उत्तरे दिले आहेत. सोशल मीडियावरुन या दोधी सतत एकमेकींवर टीका करत असतात. अशातच आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी  अमृता फडणवीस यांनी उर्फीबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे.

अमृता फडणवीस (Amruta Fadanvis) सध्या त्याचं नवीन गाणं ‘मूड बना लिया’ (Mood Bana Liya) या गाण्यामुळे खूप चर्चेत आहेत. सोशल मीडियावर त्यांच्या गाण्याने धुमाकुळ घातला असून काही दिवसातच गाणयाला 50 मिलियनपेक्षाही जास्त व्ह्युज मिळाले आहेत. अशातच त्यानी एकादा वक्तव्य केले होते की, “उर्फी एक स्त्री म्हणून जे काही करतेय, त्यात मला वावगं काहीही वाटतं नाही. ‘प्रत्येकाचे विचार हे वेगळे असतात. चित्रा वाघ यांनी त्यांचे विचार मांडले आणि त्यानुसार त्यांनी कृती केली. यात काही चूक नाही. नेहमी व्यावसायिक आणि सार्वजनिक आयुष्य हे दोन्ही वेगळवेगळे ठेवायचे असते.”

 

View this post on Instagram

 

अमृता फडणवीसांच्या अशा वक्तव्यानंतर असे दिसून येत आहे की. त्यांना उर्फीच्या आगळ्यावेगळ्या फॅशनला पाठिंबा दिला आहे त्याशिवाय त्यांनी चित्रा वाघ यांची देखिल पाठराखण केली आहे अंसही दिसून येत आहे. अमृताजींच्या अशा वक्तव्यानंतर आता उर्फीला चित्रा वाघ यांना चिडवण्यासाठी अजून संधी मिळाली आहे. अशातच उर्फीने देखिल संधीचं सोनं करुन सोशल मीडियावर ट्वीट शेअर करत लिहिले की, ‘अरे यार, देवेंद्रजी यांचा पण support नाही आहे तुम्हाला.’

अमृताजी सध्या आपल्या नवीन गाण्याच्या यशाचा आनंद लुटत आहेत. त्याशिवाय त्यांनी नुकतंच मुड बना लिया (MoodBanaleya ) या गाण्याची सक्सेसपार्टी देखिल ठेवली होती, त्याचे फोटोदेखिल सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
सुरुभी चंदनचा बॉसी लूक चाहत्यांना पाडतो प्रेमात, पाहाच फोटो
नवऱ्यासोबत रोमॅंटिक व्हिडिओ शेअर केल्यानंतर का झाल्या दीपिका चिखलीया झाल्या ट्रोल? वाचा

हे देखील वाचा